आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National News In Hindi India Vs Pakistan News In Hindi

पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताविरोधात कुख्यात दहशतवादी हाफिज सईदशी हातमिळवणी !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताचे शेजारी राष्ट्र पाकिस्तानमध्ये लोकनियुक्त सरकार परराष्ट्र धोरण ठरवत नसून मोस्ट वॉटेंड दहशतवादी हाफिज मोहम्मद सईद ठरवत आहे? हा दावा पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तांनी भारत सरकारला पाठवलेल्या पत्रात केला आहे. हे पत्र 26 नोव्हेंबर 2013 नंतर आलेले आहे.
मेल टुडे या इंग्रजी दैनिकात हे वृत्त प्रकाशित झाले आहे. भारतीय दुतावासाच्या हवाल्याने म्हटले आहे, की 'जमात उद दावा'चा चीफ हाफिज सईद याने भारतविरोधी कारवाया वाढविल्या आहे. पाकिस्तानमध्ये सईदचे किती वर्चस्व आहे, याचा अंदाज या वरून येऊ शकतो. आता सईद पाकिस्तानने भारताशी कसे संबंध ठेवायचे हे देखील ठरवत आहे. त्याने नवाज शरीफ यांच्या नेतृत्वातील सरकरला भारतासंबंधी धोरण ठरविण्यास अपात्र ठरविले आहे.