आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National News In Marathi, Digvijaya Singh On Modi

दिग्विजयसिंहांचा सूर बदलला, मोदींचे कौतुक, कॉंग्रेसच्या भात्यातील ब्रम्हास्त्र लटपटले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतातील प्रमुख चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता येणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. यामागे नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची लाट असल्याचे सांगितले जात आहे. याच लाटेवर स्वार होत कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांनी चक्क मोदींचे कौतुक केले आहे.
नरेंद्र मोदी अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयडॉलॉजीकडे जात असून "चायवाला" पंतप्रधान होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले आहे. भाजपच्या हाती सत्ता येणार नाही, अशी भूमिका यापूर्वी दिग्विजयसिंह यांनी घेतली होती.
यासंदर्भात दिग्विजयसिंह म्हणाले, की नरेंद्र मोदी धार्मिक आयडॉलॉजीपासून हळूहळू दूर जात असून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयडॉलॉजीकडे मार्गक्रमण करीत आहेत. भाजप आणि संघ परिवाराने याचे कौतुक केले पाहिजे.
सुषमा स्वराज चांगल्या पंतप्रधान होतील, असे सांगताना दिग्विजयसिंह म्हणाले, की नरेंद्र मोदी यांना भारताची जनता स्वीकारू शकणार नाही. जनतेने जरी भाजपला निवडून दिले तरी सुषमा स्वराज चांगल्या पंतप्रधान होऊ शकतील.
चायवाला होऊ शकतो पंतप्रधान, म्हणाले दिग्विजयसिंह, वाचा पुढील स्लाईडवर