आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रीय पक्षांची कमाई कोटीच्या कोटी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रीय पातळीवरील सहा राजकीय पक्षांनी राजकीय आखाड्यात केलेल्या कामगिरीपेक्षा त्यांच्या एकत्रित उत्पन्नाचा आकडा मात्र थक्क करणारा ठरला आहे. 2012-13 या काळात राष्ट्रीय पक्षांचा हा आकडा 991.20 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्सकडून (एडीआर) बुधवारी यासंबंधीचा तपशील जाहीर केला आहे. राजकीय पक्षांनी निधी व इतर स्रोतांच्या माध्यमातून हा पैसा गोळा केल्याची माहिती जाहीर झाली आहे. 3 हजार 775 दात्यांपैकी 2 हजार 371 जणांनी मात्र आपला पॅन क्रमांक दिला नाही. बसपाने 2012-13च्या दरम्यान कोणत्याही व्यक्तीकडून 20 हजार रुपयांपेक्षा अधिक निधी घेतलेला नाही, असा दावा केला आहे.

कोणाकडे किती निधी? (रुपये कोटींत)
425.69 काँग्रेस
324.16 भाजप
126.09 माकप
87.63 बसपा
26.56 राष्ट्रवादी
01.07 भाकप
आकडे 2012-13 दरम्यानचे आहेत
सर्वात मोठे दानशूर
आदित्य बिर्ला समूहाच्या जनरल इलेक्टोरल ट्रस्टकडून 7.50 कोटी रुपयांची देणगी भाजपला देण्यात आली आहे. लोढा डेव्हलपर्सने 6.99 कोटी आणि टोरँटो पॉवरने 6.57 कोटी रुपयांची देणगी दिली. टोरँटो पॉवर लिमिटेडने काँग्रेसला 3.50 कोटी व टोरँटो फार्मास्युटिकल्सने 1.50 कोटी व हैदराबाद इंडस्ट्रीज लिमिटेडने 50 लाख रुपयांची देणगी दिली आहे.