आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑड-ईव्‍हन फॉर्म्‍युला 15 दिवसांचाच, निर्णयात हस्‍तक्षेप करण्‍यास कोर्टाचा नकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्‍ली राज्‍य सरकारने प्रायोगिक तत्‍त्‍वावर लागू केलेला ऑड-ईव्‍हन फॉर्म्‍युला हा ठरल्‍याप्रमाणे 15 जानेवारीपर्यंत असणार असून, राज्‍य सरकारच्‍या निर्णयात हस्‍तक्षेप करण्‍यास उच्‍च न्‍यायालयाने नकार दिला आहे. दरम्‍यान, भविष्‍यात जर सरकार अशा प्रकारचा कोणताही फॉर्म्‍युला लागू करणार असेल तर लोकांचे म्‍हणणे विचारात घ्‍यावे, अशी सूचना उच्‍च न्‍यायालयाने केली. शिवाय नवीन वाहतूक नियमांवर सुनावनी सुरूच राहणार असून, त्‍यासाठी 15 फेब्रुवारी ही पुढील तारीख दिली आहे.
न्‍यायालयाने नमके काय म्‍हटले ...
- नवीन वाहतूक नियमांवर सुनावनी सुरूच राहणार.
- मुख्‍य न्‍यायाधीश जी. रोहिणी आणि न्‍यायाधीश जयंत नाथ यांचे खंडपीठ यावर सुनावनी करत आहे.
- खंडपीठाने म्‍हटले, ''12 याचिकाकर्त्‍यांनी जे 12 मुद्दे उपस्‍थ‍ित केले त्‍यावर दिल्‍ली सरकारने विचार करावा''.
- वाहतूक मंत्री गोपाल राय न्‍यायालयाच्‍या या निर्णयामुळे आनंदी दिसले आणि त्‍यांनी कोर्टाचे आभार मानले.
दिल्ली सरकारने काय बाजू मांडली
- या फॉर्म्‍युल्‍यामुळे प्रदूषण कमी झाले, हे दिल्‍ली सरकारने न्‍यायालयाला सांगितले.
- त्‍यासाठी दिल्ली सरकारने एन्वायरन्मेंट प्रोटेक्शन अथॉरिटीचा अहवालसुद्धा सादर केला.
- त्‍यानुसार, 5 जानेवरीला पीएम लेव्‍हल 391 होती, डिसेंबरच्‍या तुलनेत ती खूप कमी आहे. डिसेंबरमध्‍ये पीएम लेव्‍हल 500 एवढी होती.
बातम्या आणखी आहेत...