आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रातील 25 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार, अाज राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- महाराष्ट्रातील २५ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर राेजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने विज्ञान भवनात हा कार्यक्रम हाेणार अाहे. यात १७ प्राथमिक शिक्षक असून यापैकी २ शिक्षक हे विशेष श्रेणीचे आहेत. ८ माध्यमिक शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार असून १ शिक्षक हे विशेष श्रेणीचे आहेत. पदक, प्रमाणपत्र आणि ५० हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.  

या १७ शिक्षकांचा गाैरव
- नागोराव तायडे, महापालिका उच्च प्राथमिक मराठी शाळा क्र.२, घाटकोपर(प.) (मुंबई)
- उज्ज्वला नांदखिले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, साडेसतरा नळी, ता.हवेली (पुणे)
- शोभा माने, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंचणी, ता. तासगाव (सांगली)
- तृप्ती हतिसकर, महापालिका प्राथमिक शाळा, प्रभादेवी (मुंबई)
- सुरेश शिंगणे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पिंपळगाव चिलमखा, पो. उंबरखेड, ता. देऊळगावराजा (बुलडाणा)
- संजीव बागूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सांभवे, पो. माळे  ता. मुळशी (पुणे)
- राजेशकुमार फाटे ए. टी., जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डोंगरगाव, पंचायत समिती लाखनी (भंडारा)
- ज्योती बेलावळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केवनीदिवे, पो. काल्हेर, ता. भिवंडी (ठाणे)
- अर्जुन ताकटे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अहेरगाव,  (ता. निफाड, नाशिक)
- रुक्मिणी कोळेकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वांगी-२, ता. करमाळा (सोलापूर)
- रामकिशन सुरवसे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नागोबावाडी (ता.औसा जि. लातूर)
- प्रदीप शिंदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिलापूर, (ता. नाशिक)
- अमीन चव्हाण, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, निंभा, पो. देऊरवाडा, ता. दिग्रस (यवतमाळ)
- ऊर्मिला भोसले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महालदारपुरी (ता.वाशी, उस्मानाबाद)
- गोपाल सूर्यवंशी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गंजुरवाडी (ता. लातूर).

नऊ माध्यमिक शिक्षक
- नंदा राऊत, मोतीलाल कोठारी विद्यालय, कडा, ता.आष्टी (बीड)
- स्मिता करंदीकर, अहिल्यादेवी मुलींची उच्च माध्यमिक शाळा, होळकरवाडा, शनिवार पेठ, पुणे (पुणे)
- नंदकुमार सागर (मुख्याध्यापक), जिजामाता उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, जेजुरी, ता. पुरंदर(पुणे) - शर्मिला पाटील, अंबिका विद्यालय, केडगाव (ता. जि.अहमदनगर)
- सुनील पंडीत (मुख्याध्यापक), प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नवीपेठ, अहमदनगर
- कमलाकर राऊत, योगेश्वरी नूतन विद्यालय, परळी रोड, अंबाजोगाई
- संजय नारलवार (मुख्याध्यापक), प्रियंका उच्च माध्यमिक शाळा, कानेरी, ता. जि. (गडचिरोली) यांचा समावेश आहे.
- विशेष श्रेणीअंतर्गत डॉ. मीनल सांगोळे मूकबधिर शाळा, उत्तर अंबाझरी रोड, शंकरनगर नागपूर (नागपूर)  यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...