आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nationalist Congress Support Caste Based Reservation

जात आरक्षण बदलास राष्ट्रवादीकडून विरोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जातीवर आधारित आरक्षणाच्या सध्याच्या धोरणामुळे अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांना लाभ मिळत आहे. त्यामुळे यात कोणताही बदल केला जाऊ नये. त्यास आमचा विरोधच राहील, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी गुरुवारी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
सरकारी नोकर्‍यांत आरक्षण बदलण्याचे कोणतेही धोरण नसल्याचे सरकार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी स्पष्ट केले. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीनेही भूमिका स्पष्ट केली. जातीवर आधारित आरक्षण बंद करून आर्थिक निकषावर ते देण्यात यावे, असे मत काँग्रेसचे नेते जनार्दन द्विवेदी यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.