आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाेकादायक मांजाच्या वापरावर देशभर बंदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली | धारदारपणामुळे माणसांबरोबरच प्राणी आणि पक्ष्यांनाही धोका असल्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) पतंग उडवण्यासाठी मांजाच्या वापरावर देशव्यापी हंगामी बंदी घातली आहे. काच आणि धातूच्या पावडरीचे कोटिंग असलेला मांजा पर्यावरणासाठी घातक असल्याचे सांगत एनजीटीचे अध्यक्ष स्वतंत्र कुमार यांच्या न्यायपीठाने ही बंदी घातली. ही बंदी काचेचे कोटिंग असलेल्या नायलॉन, चिनी आणि सुती मांजावरही असेल.
बातम्या आणखी आहेत...