आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशभरात भिकाऱ्यांची संख्या ४ लाखांवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात भिक्षावृत्ती वाढत चालली आहे. सध्या भिकाऱ्यांची संख्या देशभरात ४ लाखाच्या घरात पोहचली आहे. सर्वाधिक ८१ हजार भिकारी पश्चिम बंगालमध्ये आहेत.सर्वात कमी लक्षद्विपमध्ये आहेत. २.२ लाख पुरूष तर १.९१ लाख महिलांचा यात समावेश असल्याची माहिती गुरूवारी सरकारच्या वतीने राज्यसभेत देण्यात आली.
सामाजिक न्याय मंत्री विजय सांपला यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही बाब स्पष्ट केली. पश्चिम बंगालनंतर उत्तर प्रदेश (६५, ८३५), बिहार ( २९, ७२३), मध्य प्रदेश (२८, ६९५) अशी संख्या उजेडात आली आहे. आसाम, मणिपूर, पश्चिम बंगालमध्ये महिला भिकाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्र शासित प्रदेशात मात्र उर्वरित देशाच्या तुलनेत भिकाऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे. दादरा-१९, नगर हवेली- २२, निकोबार ५६ असे तेथील चित्र आहे. देशाच्या राजधानीत हे प्रमाण २ हजार १८७ वर आहे. २२ राज्यांत भिक्षावृत्ती प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आहे.