आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Natrajan Says, Rahul Gandhi Requests Him To Approve Some

प्रोजेक्टसाठी राहुल गांधी टाकायचे दबाव, नटराजन यांचा काँग्रेसला घरचा आहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई/नवी दिल्ली- ऐन दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या जयंती नटराजन यांनी शुक्रवारी पक्षाला रामराम ठोकला. त्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. राहुल यांच्या सांगण्यावरून आपण अनेक प्रकल्प रोखले होते, असे त्या म्हणाल्या. तथापि, काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
जयंती नटराजन यूपीए-२ सरकारमध्ये केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री होत्या. त्यांच्यावर अनेक महत्त्वाचे प्रकल्प रोखल्याचा आरोप होता. त्यांनी शुक्रवारी चेन्नईत पत्रपरिषदेत काँग्रेस सोडण्याची घोषणा केली. त्या म्हणाल्या, प्रकल्पांच्या मंजुरीबाबत पर्यावरणमंत्री म्हणून नियमांसोबतच पक्षनेतृत्वाच्या आदेशांचे पालन केले होते. मात्र आता पक्षात लोकशाही राहिलेली नाही. येथे घुसमट होत असल्याने राजीनामा देत आहोत. तूर्तास इतर कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी त्यांचे आरोप फेटाळत सांगितले की, त्या आपल्या नव्या राजकीय गुरूंच्या इशाऱ्यावर काम करत आहेत.
सोनियांना लिहिलेल्या पत्रात सांगितली आपबीती
नटराजन यांच्या राजीनाम्याबरोबरच त्यांनी गेल्या वर्षी ५ नोव्हेंबरला सोनिया गांधी यांना लिहिलेले एक पत्रही प्रकाशात आले. यात त्यांनी एकूण परिस्थितीचे यथार्थ वर्णन केले आहे.

1. राजीनामा दिला नव्हे, घेतला
१९ डिसेंबर २०१३ : जयंती नटराजन यांनी कस्तुरीरंगन अहवालाच्या आधारे पश्चिम घाट संरक्षणासंबंधी आदेश दिला होता. यात ज्या उद्योजकांचा स्वार्थ होता त्यांचा विरोध सुरू होता.
२० डिसेंबर २०१३ : तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी मला बोलावून घेतले. सांगितले की, मी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि पक्षकार्यात झाेकून द्यावे, अशी सोनिया गांधी यांची इच्छा आहे.

2. प्रतिमा मलिन झाली तरीही शांतच
२१ डिसेंबर २०१३ : राहुल यांनी फिक्कीच्या परिषदेत उद्योगपतींना ‘पर्यावरण मंजुरीत आडकाठ्या येत असल्याने तुम्ही अस्वस्थ आहात. आता हा विलंब होणार नाही’, असे सांगितले. यानंतर माझ्या कार्यपद्धतीकडे शंकेने पाहिले जाऊ लागले. तरीही मी शांत होते.
3. राहुल यांनी भेटीसाठी वेळच दिला नाही
२१ डिसेंबर (सायंकाळी) : राहुल यांचे भाषण यू ट्यूबवर ऐकले. त्यांना भेटीसाठी वेळ मागितली. ते म्हणाले, ‘सध्या मी व्यग्र आहे. नंतर भेटू.’ ताे भेटीचा दिवस आलाच नाही. खुन्यालाही न्यायालयात बाजू मांडण्याची संधी मिळते. मला ती संधी दिली नाही.

4. तुम्ही सांगितले तेच आदेश पाळले
जानेवारी २०१४ चा पहिला आठवडा : तुमची (सोनियांची) भेट घेऊन माध्यमांत माझ्याबद्दलच्या नकारात्मक बातम्यांबद्दल सांगितले. यावर तुम्हीही माध्यमांशी न बोलण्याचा सल्ला दिला. मी गप्पच राहिले. यानंतर मात्र मला पक्षामध्ये कोणतीही जबाबदारी मिळाली नाही.
नटराजन यांच्या लेटर बॉम्बसंदर्भात काय म्हणाले, जनता दल युनायटेडचे शरद यादव... भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर... आणि कॉंग्रेसचे पी. सी. चाको... वाचा पुढील स्लाईडवर... जयंती नटराजन यांचे लेटर वाचा जशेच्या तशे...