आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नावेदची करण्‍यात आली पॉलिग्राफी टेस्ट, अनेक गुपिते अाली उघडकीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नावेदच्या चौकशीनंतर एनआयएने दोन दहशतवाद्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. एकाचे नाव जरघम दुसरा अबू ओकाशा आहे. - Divya Marathi
नावेदच्या चौकशीनंतर एनआयएने दोन दहशतवाद्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. एकाचे नाव जरघम दुसरा अबू ओकाशा आहे.
श्रीनगर/ नवी दिल्ली - उधमपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे मास्टरमाइंड दक्षिण काश्मीरमधून पळून गेल्याची माहिती लष्कर पोलिसांच्या हाती आली आहे. पळून गेलेले दोन अतिरेकी उधमपूर हल्ल्याचे मास्टरमाइंड असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, नावेदची मंगळवारी पॉलिग्राफी टेस्ट करण्यात आली. त्याने यात अनेक गुपिते उघड केली आहेत. त्याला विचारलेले प्रश्न असे...
कुठला आहेस? किती जण आला होतात?
फैसलाबादचा आहे. आम्ही चौघे आलो होतो.
"लष्कर'शी कधी पासून संबंध आहेत?
दोन वर्षांपासून. ऐश करण्यासाठी पैसा मिळतो ना...
प्रशिक्षण कोण देतो? हाफिजला भेटलास?
"लष्कर'चे लोक आम्हाला प्रशिक्षण देतात. चार वेळा अशा शिबिरात मी हाफिज सईदला भेटलो. त्याने मला प्रशिक्षण दिले.
तो काय सांगत होता? प्रशिक्षण कुठे घेतले?
धर्म आणि जिहादच्या गोष्टी तो करत होता. तो मोठ्या गाडीत फिरतो. त्याची सुरक्षा आयएसआय आणि पाकिस्तानी लष्करातील जवानांकडे आहे. सवाईनाला कॅम्पमध्ये मला प्रशिक्षण दिले.
लख्वीला कधी भेटलास?
मेच्या शेवटच्या आठवड्यात भेटलो होतो.
तुझ्या सोबत प्रशिक्षण कुणी घेतले?
चाळीसते पन्नास तरुण होते.
कॅम्पमध्ये काय सांगितले?
हिंदुस्तानमध्ये पाच-सहा ठिकाणी स्फोट घडवायचे आहेत. परत आलात तर जगातील सर्व सुखसोयी असतील, असेही सांगितले.
तुला पाठवले तेव्हा काय सांगितले?
छोटी शस्त्रे घेऊन तुम्ही सीमेवर पोहचा. पाकिस्तानी लष्कर तुम्हाला घुसखोरीत मदत करेल. त्यानंतर सर्व स्थानिक सुविधा मिळतील.
काश्मीरमधून मदत मिळाली?
हो.आम्हाला घातक शस्त्रे पुरवली. खाण्याचे पदार्थ आिण पांढऱ्या रंगाच्या कॅप्सुलही दिल्या. कुठे थांबायचे हे सांगण्यात आले. अबू कासिम नामक माणूस भेटेल. तोच तुम्हाला पुढे नेईल, असे सांगितले. त्यानंतर तोच लाल फेटा घातलेला माणूस कुणासोबत जायचे ते सांगेल, असेही सांगण्यात आले.
पकडला जाशील असे वाटले होते?
पकडले जाण्यापूर्वीच आत्महत्या करायची असे प्रशिक्षणच दिले आहे. मात्र, ती संधीच मिळाली नाही.
कॅम्पमध्ये भारतातील लोकांशी बोललात?
हो.काश्मीर, बंगळुरू आणि नेपाळमधील लोक बोलतात.
कोण लोक बोलतात?
माझ्यासारखेच तरुण. त्यांना इथूनच भारतात पाठवलेले आहे.