आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२५,००० कोटींचा ऑनलाइन बाजार!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - शनिवारपासून सुरू झालेल्या नवरात्राने यंदाचा सणासुदीचा काळ सुरू झाला. हा फेस्टिव्ह सीझन ९२ दिवस म्हणजे या वर्षाअखेरपर्यंत राहील. असोचेमच्या अंदाजानुसार या काळात लोक सुमारे २५ हजार कोटी रुपयांची ऑनलाइन खरेदी करतील. गेल्या वर्षी याच काळात २० हजार कोटींची खरेदी झाली होती. म्हणजेच यंदा २५ टक्के अधिक ग्राहकी असेल. या दृष्टीने हा सर्वांत मोठा फेस्टिव्ह सीझन ठरेल.

यंदा केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. शिवाय जानेवारीपासून जुलैपर्यंत ३४,००० कोटी थकीत बाकी म्हणून खिशात पडले आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांनाही यंदा ७८ दिवसांचा बोनस दिला जाणार आहे. ऑक्टोबरपासूनच शेतातील पिकांची काढणी सुरू होते. यंदा चांगल्या पावसामुळे उत्पादन वाढणार असल्याने गावांतही विविध वस्तूंची मागणी वाढेल, अशी आशा आहे.
६० टक्के लोकांनी सांगितले की, एखाद्या दालनात जाऊन खरेदी करण्यापेक्षा ते ऑनलाइन खरेदी करणे पसंत करतील. त्यांची यादी तयार आहे. पितृपक्षामुळे हे लोक थांबले होते.
बहुतांश ई-रिटेलर जादा डिस्काउंट, विशेष उत्पादने, कॅशबॅक योजना घेऊन आले आहेत. याचा लाभ घेण्याचा लोकांचा विचार आहे. असोचेमने १० मोठ्या शहरांत २५ ते ४० वर्षे वयाच्या २,५०० लोकांचे सर्वेक्षण केले.
बातम्या आणखी आहेत...