आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Navy Chief Admiral DK Joshi Quits After Another Submarine Fire, Govt Quickly Accepts Papers

सिंधुरत्न दुर्घटनेनंतर नौदलप्रमुखांचा राजीनामा; केंद्र सरकार अडचणीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली, मुंबई - नौदलप्रमुखांनी राजीनामा दिला आणि कें द्र सरकारने तो तत्काळ मंजूर केल्यामुळे सरकारच अडचणीत सापडले आहे. आता केंद्र सरकारला त्याबद्दल स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे. राजीनामा घाईघाईत मंजूर केला नाही. पंतप्रधानांची भेट घेतली होती. सर्वांशी सल्लामसलत केल्यानंतर आपण राजीनामा स्वीकारला, असे संरक्षणमंत्री ए.के.अँटनी यांनी सांगितले. सिंधुरत्न पाणबुडीच्या अपघातानंतर बुधवारी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल डी.के.जोशी यांनी राजीनामा दिला होता. सरकारने तो तत्काळ मंजूर केल्यामुळे वादाचे मोहोळ उठले आहे. नौदलाच्या माजी अधिकार्‍यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

दुर्घटनेमुळे राजीनामा देणारे पहिलेच नौदलप्रमुख : दुर्घटनेमुळे राजीनामा देणारे 59 वर्षीय जोशी हे पहिलेच नौदलप्रमुख आहेत.

त्यांचा 15 महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक होता. आपल्या पत्नीसोबत चर्चा केल्यानंतर राजीनाम्याचा निर्णय घेतला होता. दुर्घटनेची जबाबदारी आपल्याच घ्यायला हवी असे मी त्याचवेळी ठरवले होते. असा संदेश जोशी यांनी आपल्या सहकार्‍यांना पाठवला होता.

अपघाताच्या चौकशीस सुरुवात
आयएनएस सिंधुरत्न पाणबुडी गुरुवारी मुंबईच्या गोदीत परतली. रशियन बनावटीच्या या पाणबुडीला आग लागली होती. आगीमुळे प्रचंड धुराचे लोट उठल्याने सात नौसैनिक बेशुद्ध पडले होते. त्यांना हेलिकॉप्टरद्वारे मुंबईत आणले होते. दोेन अधिकारी लेफ्टनंट कमांडर कपीश मुवाल आणि लेफ्टनंट मनोरंजन कुमार बेपत्ता होते. नौदलाने गुरुवारी या दोन्ही अधिकार्‍यांचा मृत्यूला दुजोरा दिला आहे. रियर अ‍ॅडमिरल दर्जाच्या अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली आयएनएस सिंधुरत्नसह इतर पाणबुड्यांच्या अपघाताचीही चौकशी सुरू झाली आहे.

सिन्हा यांच्याही राजीनाम्याची शक्यता
नौदलप्रमुख जोशी यांच्या राजीनाम्यानंतर सर्वांचेच लक्ष आता वेस्टर्न नेव्ही कमांडर आणि व्हाइस अ‍ॅडमिरल शेखर सिन्हा यांच्यावर आहे. तेसुद्धा राजीनामा देतील असे सांगितले जाते. येत्या एक-दोन दिवसांत संरक्षणमंत्री अँटनी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्या वेळी जोशी यांच्या राजीनाम्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा होईल. नौदलात जोशी यांच्या खालोखाल तेच वरिष्ठ अधिकारी आहेत. व्हाइस अ‍ॅडमिरल धोवन आणि इस्टर्न नेव्हल कमांडर अनिल चोप्रा यांच्यासोबत नौदलप्रमुखपदाच्या शर्यतीत आहेत.