आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नौदल अधिकार्‍याने वरिष्ठांसोबत संग करण्याची पत्नीवर केली बळजबरी !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय नौदलातील एका अधिकार्‍याच्या पत्नीने नौदलातील वरिष्ठ अधिकार्‍यांवर गंभीर आरोप केला आहे. अधिकार्‍याच्या पत्नीने आरोप केला आहे की, पतीच्या संमतीने त्याच्या वरिष्ठ धिकार्‍यांनी तिचे लैंगिक शोषण केले आहे. महिलेच्या तक्रारीनंतर कोच्ची पोलिसांनी महिलेच्या पतीसह १० नौदल अधिकार्‍यांविरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा नोंदवला आहे. मात्र, नौदलातील उच्च पदस्थांनी हे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे.

नौदल अधिकार्‍याच्या पत्नीने ज्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत त्यापैकी सहा नौदल अधिकारी आणि तीन त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. ओडिसा येथील या महिलेचा गेल्या वर्षी विशाखापट्टनम मध्ये विवाह झाला. सध्या ती दिल्लीमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे, त्यामुळे तिने दिल्ली पोलिसांकडे संपर्क करून तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा हुंड्यासाठी पती आणि सासरच्या मंडळीकडून छळ होत होता. तिच्या पतीने स्वतःच्या पदोन्नतीसाठी तिला वरिष्ठ अधिकार्‍यांबरोबर शारीरिक संबंध ठेवण्याची बळजबरी केली होती. तिने या कृत्याला नकार दिल्यानंतर तिच्या पतीने तिचा शारीरिक आणि मानसीक छळ करण्यास सुरूवात केली.
मात्र, नौदलाने महिलेचे आरोप फेटाळून लावत म्हटले आहे की, या दांपत्याचे आपसात वाद आहेत. त्यामुळेच तिने इतर आधिकार्‍यांवर आरोप केले आहेत. ज्या अधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.