आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nawaz Sharif Daughter Marayam Sharif Pakistan India Modi BJP

मुलीने समजावल्याने भारत दौ-यासाठी तयार झाले शरीफ, जाणून घ्या कोण आहे मरियम..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भारत दौ-याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर त्यांची मुलगी मरियमने जाहीरपणे आनंद व्यक्त केला. भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे नाते नव्या आणि शांतीच्या दिशेने सुदृढ होण्याची आशा मरियमने व्यक्त केली आहे. भारत आणि पाकिस्तान भूतकाळातील घटनांमुळे एकमेकांना विरोध करत आहेत. दोन्ही देशांनी आपसांतील वैर विसरून नव्याने सुरुवात करणे गरजेचे असल्याचे, मरियमने ट्वीटरवर पोस्ट केले आहे. पण मरियमच्या या आनंदाचे कारण नेमके काय आहे.
शरीफ यांनी भारत दौ-याला होकार देण्यामागे ज्यांचे महत्त्वाचे योगदान आहे, त्यांच्यात शरीफ यांची मुलगी आणि पाकिस्तानच्या सत्ताधारी पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज) या पक्षाच्या नेच्या मरियम नवाज शरीफ यांचाही महत्त्वाचा वाटा आहे. मरियम यांनी भारताचे आमंत्रण हे एक सकारात्मक पाऊल असल्याचे सांगत आपल्या वडीलांना होकार कळवण्याचा सल्ला दिला होता. झालेही तसेच.
पाकिस्तानच्या राजकारणात मरियम यांना एक तरुण तडखदार नेत्या म्हणून ओळखले जाते. नवाज यांच्या पक्षानेच त्यांना एक वेगळी उंची असल्याचे मान्य केले होते. मरियम पाकिस्तानच्या राजकारणात कशा आल्या आणि त्यांचा प्रवास कसा होता, हे जाणून घेऊयात...
पुढे वाचा - लग्नाच्या आधी होते मरियमचे अफेयर?