फाइल फोटो : नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यानंतर शुभेच्छा देताना नवाज शरीफ.
नवी दिल्ली - साडी आणि शॉलनंतर आता भारत आणि पाकिस्तानदरम्यान 'मँगो' डिप्लोमसी सुरू झाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी देशात राजकीय अस्थैर्याचे वातावरण असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास आंबे पाठवले आहेत.
नवाज शरीफ यांच्याकडून पंतप्रधानांबरोबरच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनाही आंब्यांची भेट पाठवली आहे. नवाज शरीफ यांनी त्यांच्या आवडत्या आंब्याचे बॉक्स पाठवले असून यात सिंधरी आणि चौसा या जातीचे आंबे असल्याची माहिती मिळाली आहे.
का पाठवले आंबे?
भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासीत यांनी काश्मीरच्या फुटीरतावादी नेत्यांची भेट घेतल्याने भारताने दोन्ही देशांमधील सचिव स्तरावीर चर्चा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे दोन्ही देशांचे संबंध पुन्हा बिघडण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी भारताकडून निर्माण करण्यात आलेल्या दबावामुळे शरीफ यांनी संबंध सुधारण्यासाठी अशा प्रकारे आंबे पाठवले असण्याची शक्यता आहे. परराष्ट्र तज्ज्ञांच्या मते मँगो डिप्लोमसीच्या बहाण्याने शरीफ या महिन्यात न्यूयॉर्कमध्ये होणा-या यूएन जनरल असेंबलीच्या दरम्यान मोदींची भेट घेण्यासाठी पूरक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहेत.
पुढील स्लाइडवर वाचा, भारताच्या पावलाने मिळाले बळ