आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'हाफिज सईद अशी कोणती अंडी देतो म्हणून आपण त्याला पाळले\', शरीफ यांच्या खासदारांचा सवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाफिज सईदला पाकिस्तान का सांभाळत आहे, असा सवाल सत्ताधारी पक्षाच्या खासदाराने उपस्थित केला आहे. - Divya Marathi
हाफिज सईदला पाकिस्तान का सांभाळत आहे, असा सवाल सत्ताधारी पक्षाच्या खासदाराने उपस्थित केला आहे.
इस्लामाबाद - मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदवर कारवाई केली जात नाही याने संतापलेल्या एका खासदाराने नवाज शरीफ यांना घरचा आहेर दिला आहे. खासदार राणा मोहम्मद अफजल म्हणाले, 'हाफिज सईद आणि इतर नॉन स्टेट अॅक्टर्सवर कारवाई का होत नाही ? हाफिज काय आपल्याला अंडी देतो, म्हणून आपण त्याला पाळलेले आहे.' राणा अफजल पीएम शरीफ यांच्या पीएमएलएन पक्षाचे खासदार आहेत. त्यांनी स्वपक्षीयांसमोर काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
राणा मोहम्मद अफजल यांनी उपस्थित केले सवाल
- पाकिस्तानी वृत्तपत्र द डॉनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानमध्ये गुरुवारी परराष्ट्र व्यवहार खात्याच्या समितीची बैठक झाली. त्यात पाकिस्तान एकटे पडत असल्यावर वादळी चर्चा झाली.
- खासदार राणा यांनी हाफिज सारख्या नॉन अॅक्टर्सविरुद्ध कारवाईची मागणी केली. अशा लोकांवर कारवाई होत नाही यामुळे त्यांनी आपल्याच पक्षाला खडे बोल सुनावले.
- ते म्हणाले, 'कोणी तरी सांगावे, अखेर हाफिज सईद अशी कोणती अंडी देतो ज्यामुळे आपण त्याला पाळले आहे?'
- राणा म्हणाले, 'आमच्या परराष्ट्र धोरणाची ही अवस्था आहे की आम्ही आजपर्यंत हाफिज सारख्या लोकांना संपवू शकलेलो नाही.'
- नुकत्याच झालेल्या फ्रान्स दौऱ्याचा उल्लेख करुन राणा म्हणाले, तेथील लोकांनीही काश्मीर परिस्थितीवर चर्चा केली. ते विचारता की दरवेळी हाफिजचेच नाव का समोर येते ?
पुढील स्लाइडमध्ये, सईद बद्दल काय म्हणाले राणा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...