आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Naxal Violence Has No Place In Democracy: Prime Minister Manmohan Singh.

राज्यघटनेच्या चौकटीत राहूनच नक्षलींशी चर्चा- पंतप्रधान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशातंर्गत सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून, नक्षलवादाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारसह सर्व राज्यांना एकत्रित काम करावे लागेल. याचबरबोर लोकशाहीच्या चौकटीत राहून नक्षलवाद्यांशी चर्चा करता येईल. मात्र लोकशाहीमध्ये नक्षलवादाला व हिंसेला कोठेही स्थान नाही, असे स्पष्ट मत पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी व्यक्त केले. पंतप्रधान सिंग आज सुरक्षेसंदर्भात आयोजित केलल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत बोलत होते.

सिंग म्हणाले, मागील पंधरवड्यात छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षली हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर आज आपण भेटत आहोत. भारतीय जनतेने लोकशाहीयुक्त राज्यघटना स्वीकारली आहे. राज्यघटनेनुसार जनतेद्वारे निवडून आलेल्या लोकशाही सरकारमध्ये अशा घटकांना व घटनांना स्थान नाही. मात्र, तरीही राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकाराच्या चौकटीत राहून अशा घटकांशी चर्चा करता येईल. मात्र, त्यांच्याद्वारे झालेली हिंसा कोणत्याही स्थितीत खपवून घेतली जाणार नाही. भविष्यात अशा घटना, हिंसाचार घडू नये, यासाठी केंद्र सरकारबरोबरच राज्यांनीही एकत्रितपणे काम करण्याची गरज असून, त्याद्वारे या घटकांना पायबंद घालता येईल, असेही सिंग यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.

यासंदर्भात देशातील नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या चार-पाच राज्यांच्या 34 भागांमध्ये केंद्र सरकार उपाययोजना करीत असल्याची माहितीही सिंग यांनी दिली. देशामध्ये धार्मिक सलोखा ठेवण्याची गरज असून, दहशतवादाला तोंड देण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले.