आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली-NCRमध्ये 9 संंशयित अटकेत; 6 पिस्तुल आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोएडा- उत्तर प्रदेश अँटी टेररिझम स्वॉडने (एटीएस) दिल्ली- NCR मध्ये 9 संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 6 पिस्तुल, 50 कारतूसे, ग्रेनेड, 3 कार, 125 डिटोनेटर्स आणि 2 लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय त्यांच्याकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

मोठा घातपात करण्याच्या इराद्याने हे लोक आल्याचे एटीएसने म्हटले आहे. एटीएसचे अधिकारी त्यांची कसून चौकशी करत आहे. दुपारी पत्रकार परिषद घेऊन कारवाईची माहिती देण्याची शक्यता आहे.

आठ हजार रुपये भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहात होते संशयित...
- मिळालेली माहिती अशी की, हिंडन विहारमधील फ्लॅट नंबर 1 आणि 3 मध्ये हे लोक भाड्याने राहात होते. दोन्ही फ्लॅट बेनू वेद नामक व्यक्तीचे आहेत.
- एटीएसने आरोपींकडून काही महत्त्वाचे दस्ताऐवज आणि नकाशेही जप्त केले आहे. अटक करण्‍यात आलेल्या आरोपींमध्ये मध्ये एक जण बॉम्ब बनवण्यात तरबेज आहे.
- पाच महिन्यांपूर्वी अटक करण्यात आलेल्या सहा अतिरेक्यांपैकी एकाची बहीण देखील याच फ्लॅटमध्ये राहात होती. बेनू वेद याने हा फ्लॅट अतिरेक्यांना 8 हजार रुपये महिन्याने भाड्याने दिला होता.
- मुंबई तसेच इतर राज्यातून त्यांना भेटण्यासाठी त्याचे साथीदार येत असल्याची माहिती एटीएसला मिळाली आहे. फ्लॅटमध्ये तरुणींचे ड्रेसही आढळून आले आहे.

कसे झाले ऑपरेशन?
- सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, 3 दिवसांपूर्वी एटीएसने या भागाची रेकी केली होती. त्यानंतर एका संशयित व्यक्तीला दिल्ली अटक करण्यात आली होती. त्याने दिलेल्या माहितीनुसार, एटीएस कमांडोजनी शनिवारी सायंकाळी 7 वाजता नोएडातील हिंडन विहारमध्ये ही कारवाई केली.
पोलिस काय म्हणतात...
- आयजी (एटीएस) असीम अरुण यांनी सांगितले की, नोएडामधील एका फ्लॅटमध्ये 9 अतिरेकी नाव बदलून राहात असल्याची माहिती मिळाली होती. पोलिस एक महिन्यापासून त्यांच्यावर लक्ष ठेऊन होते.

अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे....
1. रंजीत पासवान उर्फ संतोष, चंदोली यूपी
2. पवन झारखंड उर्फ भाई जी, मधुबनी बिहार
3. सचिन कुमार, ग्रेटर नोएडा
4. कृष्णा कुमार, सासाराम बिहार (बॉम्ब एक्सपर्ट)
5. सूरज, फतेहाबाद बुलंदशहर
6. आशीष सारस्वत, चण्डौस अलीगड
7. सुनील कुमार यादव, सासाराम बिहार
8. ब्रज किशोर तोमर, चण्डौस अलीगड
9. शैलेंद्र कुमार, बक्सर बिहार

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, संबंधित फोटोज....
बातम्या आणखी आहेत...