आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Naxals Planning Major Sabotage In Chattisgarh During Election

नक्षलवाद्यांकडून छत्तीसगडमध्‍ये मोठ्या घातपाताची तयारी, निवडणूक निशाण्‍यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- छत्तीसगडमध्ये 11 नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी प्रचार काळात तेथे एखादा मोठा घातपात घडवून आणण्याची तयारी नक्षलवादी करत आहेत. या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेत अडथळे निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश आहे. गुप्तचर यंत्रणेतील सूत्रांनी याबाबत केंद्र व राज्य सरकारला सावधगिरीचा इशारा दिला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नक्षलग्रस्त राज्य ओडिशा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व झारखंडमधील 50 पेक्षा जास्त नक्षलवादी कमांडर 29 ऑक्टोबरला बस्तर येथे झालेल्या बैठकीस उपस्थित होते. त्यांच्याशिवाय नक्षली गुरिल्ला आर्मीचे 400 पेक्षा जास्त सदस्य बैठकीस हजर होते. नक्षलवादी कमांडरच्या या बैठकीची छायाचित्रेही गुप्तचर यंत्रणेला प्राप्त झाली आहेत. प्राप्त माहितीनुसार नक्षलवाद्यांच्या या योजनेची माहिती गृह मंत्रालय व संबंधित राज्यांना देण्यात आली आहे. या माहितीनुसार आठ किंवा नऊ नोव्हेंबरला छत्तीसगड व मध्य प्रदेशच्या सीमेवर काही भागांत घातपाताच्या घटनेला मूर्त रूप देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यात सुरक्षा दलातील जवानांना लक्ष्य केले जाऊ शकते.
नक्षली उपद्रव ध्यानात घेऊन गृह मंत्रालयाकडून पाच राज्यांमध्ये शांततापूर्ण मतदान प्रक्रियेसाठी निमलष्करी दल व पोलिसांची मोठ्या प्रमाणावर मदत घेण्यात येणार आहे. सोबत मंत्रालयाने आपल्या नक्षलविरोधी विभागाची सूत्रे सांभाळणा-या सचिवांनाही विशेष सावधगिरी बाळगण्याचे आदेश
दिले आहेत.