आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nayantara Sahgla And 9 Other Writers Takes Back Their Award

#AwardWapsiReturns नयनतारासह 10 लेखकांनी परत घेतले अवॉर्ड्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेखिका नयनतारा सहगल. (फाइल फोटो) - Divya Marathi
लेखिका नयनतारा सहगल. (फाइल फोटो)
नवी दिल्ली - देशात असहिष्णुता वाढल्याचा आरोप करत साहित्य अकादमी पुरस्कार परत करणाऱ्या 10 लेखकांनी त्यांचे अवॉर्ड परत घेतले आहेत. यामध्ये नयनतारा सहगल आणि राजस्थानच्या नंद भारद्वाज यांचाही समावेश आहे. दरम्यान मी पुरस्कार परत घेतलेला नसून, अकादमीच्या धोरणाचे पालन करत असल्याचे नयनतारा यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे.

यासाठी होती पुरस्कार वापसी
- गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये उत्तर प्रदेशच्या दादरीमध्ये एका व्यक्तीची गोमांस खाल्ल्याच्या कारणावरून हत्या करण्यात आली होती.
- त्यापूर्वी लेखक एमएम. कलबुर्गी यांची गोळ्या घालून हत्यादेखिल करण्यात आली होती.
- या घटनांनी नाराज होऊन साहित्यिकांनी पुरस्कारवापसी सुरू केली होती.
- 40 हून अधिक लेखकांनी देशात वाढणाऱ्या असहिष्णुतेच्या वातावरणाविरोधात पुरस्कार परत केले होते.
- याची सुरुवात नयनतारा सहगल यांनी पुरस्कार परत करत केली होती. त्यांनी 1 लाखांचा चेकही अकादमीला परत केला होता.
- आमिर खान, शाहरुख खान, एआर रेहमान आणि अरुंधती रॉयसारख्या बड्या हस्तींनीही याबाबत वक्तव्ये दिली होती. त्यावरूनही वाद झाला होता.
- विरोधकांनी भाजप आणि त्यांच्या समर्थकांवर देशात धार्मिक आधारावर तणाव वाढवल्याला आरोप केला होता.
- त्यावर अनेक केंद्रीय मंत्र्यांनी काँग्रेससह अनेक पक्ष सरकारची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले होते.

साहित्य अकादमीची भूमिका
- साहित्य अकादमीने पुरस्कार परत करणाऱ्या सर्व लेखकांना पत्र लिहिले होते.
- अकादमीकडे पुरस्कार परत घेण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. एकदा दिलेले पुरस्कार परत घेतले जात नाहीत. त्यामुळे सर्व लेखकांनी त्यांचे पुरस्कार परत घ्यावेत असे त्यात लिहिलेले होते.

अकादमीच्या भूमिकेवर समाधानी : नंद भारद्वाज
- राजस्थानी लेखक नंद भारद्वाजही त्यांचा पुरस्कार परत घेण्यावर राजी झाले.
- ते म्हणाले, असहिष्णुतेच्या मुद्दयावर साहित्य अकादमीच्या भूमिकेबाबत समाधानी असल्याने पुरस्कार परत घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले.
- भारद्वाज त्यांचा 50 हजारांचा चेक परत घेण्यासही तयार झाले आहेत.
- त्यांच्याशिवाय इतर 8 लेखकही पुरस्कार परत घ्यायला तयार झाले आहेत.

पुढे वाचा, अवॉर्ड केवळ निर्जीव वस्तू नाही, तो परत करणे अयोग्य