आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनसीसी संचालनात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ल- गेल्या२५ वर्षांपैकी १७ वेळा पंतप्रधान बॅनरचा बहुमान मिळवणाऱ्या महाराष्ट्राला एनसीसी संचालनात यावर्षी मात्र तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ‘पंजाब, चंदिगड, हरियाणा हिमाचल प्रदेश’ या संयुक्त संचालनालयाला पंतप्रधान बॅनरचा तर ‘कर्नाटक गोवा’ या संयुक्त संचालनालयाला उपविजेतेपदाचा मान मिळाला आहे.

दिल्लीतील छावणी भागातील गॅरीसन परेड ग्राउंडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवारी ‘पंतप्रधान रॅली’चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पुरस्कारांची घोषणा पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, संरक्षण राज्यमंत्री राव इंद्रजित सिंह, संरक्षण सचिव जी.मोहन कुमार, लष्कर प्रमुख जनरल दलवीर सिंह, वायुसेना प्रमुख एअरचिफ मार्शल अरूप राह, नौसेना प्रमुख ॲडमीरल आर.के.धवन आणि एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अनिरुद्ध चतुर्वेदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमात उपस्थित देशभरातील २१०० एनएसएस कॅडेटसना संबोधित केले. ‘आपआपल्या गावी जाताना सर्वांनी स्वच्छता देशप्रेमाचा संदेश घेऊन जा. त्याचा आपल्या परिसरात विस्तार करा देशसेवेचे व्रत कायम पाळा’ असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

नाशिकचे ‘सोंगी लोकनृत्य’ प्रथम
प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर आयोजित पथसंचलनात शालेय विद्यार्थ्यांद्वारे सादर करण्यात आलेल्या लोकनृत्य श्रेणीत नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘सोंगी मुखवटा लोकनृत्या’ने प्रथम पुरस्कार पटकावला अाहे. पेठ तालुक्यातील धाब्याचा पाडा येथील हे लाेकनृत्य अाहे. त्यात नाशिकमधील ११६ कलाकारांच्या चमूने सहभाग घेतला हाेता. विशेष म्हणजे पथसंचलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सोंगी मुखवटा लोकनृत्या’चे छायाचित्र ट्विट केले.