आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCDRC Rejects Cold Storage's 40 L Insurance Claim

40 लाखांचा दावा राष्ट्रीय ग्राहक आयोगाने फेटाळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - शीतगृहामध्ये बटाटे खराब झाल्याचे सांगून 40 लाख रुपयांचा दावा राष्ट्रीय ग्राहक आयोगाने फेटाळला. एखाद्या वस्तूला बेजबाबदारपणे हाताळण्याची सवय सामान्यपणे आढळून येते. ही प्रवृत्ती चुकीची आहे, अशा शब्दांत आयोगाने शीतगृहाला फटकारले.

उत्तर प्रदेशातील जैस्वाल कोल्ड स्टोरेज अँड आइस फॅक्टरीकडून ही याचिका दाखल करण्यात आली होती. न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेडकडे हा दावा करण्यात आला होता. 40 लाख 20 हजार रुपयांचा हा दावा होता. पदार्थांची काळजी घेतली नाही तरी चालते. त्या वस्तूंचा विमा आहे. मग कशीही वापरा, अशी सामान्य लोकांची भावना असते, असे राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. एम. मलिक यांनी म्हटले आहे.

शीतगृहासाठी लागणार्‍या साहित्याची योग्य प्रकारे निगा आणि त्याच्या दुरुस्तीचे काम करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे प्राथमिक पाहणीतून स्पष्ट झाले. याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार 1996 मध्ये त्यांनी बटाट्याला शीतगृहात ठेवण्यासाठी विमा उतरवला होता. हा विमा 56 लाख 25 हजार रुपयांचा आहे.