आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Chief Sharad Pawar Backs Anti BJP Alliance Under Nitish Kumar

नितीशकुमार हे भाजपविरोधी आघाडीचा सर्वाधिक विश्वासार्ह चेहरा ठरतील: पवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राहुल गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेसपेक्षा सोनिया गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेस प्रभावी असेल, मात्र बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे भाजपविरोधी आघाडीचा सर्वाधिक विश्वासार्ह चेहरा ठरतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी म्हटले आहे.

एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत पवार म्हणाले, या घडीला विरोधकांना एकत्र यायचे व पर्याय द्यायचा असेल तर त्यांचे (नितीश) नाव पहिल्या क्रमांकावर असेल. काँग्रेसकडे तसा चेहरा नाही आणि नितीश हे मुख्यमंत्री असल्याने त्यांना तो ‘अधिकार’ही पोहोचतो. भाजपविरोधी आघाडीसाठी नितीश हे ‘प्रबळ शक्ती’ ठरतील.

बिगर भाजप आघाडीशी हातमिळवणीसाठी राष्ट्रवादीचे सर्व पर्याय खुले आहेत. भाजपविरोधी कोणत्याही आघाडीसाठी नितीश कुमार हे ‘प्रबळ शक्ती’ ठरतील.