आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Comment On Congress News In Marathi, D.P.Tripathi

कॉंग्रेसला आघाडीची अक्कल नाही, \'राष्ट्रवादी\'ने साधला मुख्यमंत्री पृथ्वीराजांवर निशाणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कॉंग्रेसने राष्ट्रवादीला कमी लेखू नये. लोकसभेत राष्ट्रवादीने कॉंग्रेसपेक्षा जास्त जागा मिळवल्या आहेत. मुळात काँग्रेसला आघाडी चालवायची अक्कल नाही, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे महासचिव आणि मुख्य प्रवक्ते खासदार डी. पी. त्रिपाठी यांनी केली.
त्रिपाठी दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. याशिवाय महाराष्‍ट्रात पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्त्व काय ते लोकसभा निवडणुकीत कळाले आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी त्रिपाठी म्हणाले, की पृथ्वीराज चव्हाण यांची क्षमता काय आहे, हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले. आम्ही कॉंग्रेसचे अनुयायी नसल्याचेही त्रिपाठी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. देशाचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांनी केलेल्या खुलाशाला राष्ट्रवादीचे समर्थन आहे. नटवर सिंह यांच्या आत्मकथनात लिहिलेले काहीच चुकीचे नसल्याचेही त्रिपाठी यांनी पत्रकारांना सांगितले.
डी. पी. त्रिपाठी यांनी सांगितले की, आमचे कॉँग्रेसवर प्रेम आहे. मात्र ते दोन्ही बाजूने सारखे असायला पाहिजे. आम्हाला राज्यात विधानसभेच्या 144 जागा पाहिजे आहेत तशी आम्ही कॉँग्रेसला मागणी केली आहे. परंतु कॉँग्रेसमध्येच अंतर्गत वाद सुरु असल्याचे दिसून येते. पुन्हा किती काळ प्रतिक्षा करायची. लोकसभेत कॉँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीने उत्तम कामगिरी केल्याने आम्हाला विधानसभेत अधिक जागा मिळणे हा आमचा अधिकार आहे. तरीही आम्ही 50-50 हे सुत्र ठेवले आहे. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये प्राथमिक बैठक झाली तेव्हा आम्ही आमच्या भावना त्यांना कळविल्या होत्या परंतु अद्यापही कॉँग्रेसकडून पुढचे पाऊल टाकण्यात आले नाही.
राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत हात मिळवणी करण्यासाठी अनेकजण तयार आहेत. परंतु गेल्या 15 वर्षांपासून संबंध असलेल्या कॉँग्रेसला आम्ही सातत्याने प्राथमिकता देत आलो आहे. मात्र, अधिक काळ थांबणार नाही असेही खा. त्रिपाठी यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद समजून न घेता कॉंग्रेस प्रतिस्पर्ध्याप्रमाणे स्पर्धा करताना दिसत असल्याचेही त्रिपाठी म्हणाले. कॉंग्रेस नेहमीच सहकारी पक्षांना दाबावात घेण्याचा प्रयत्न करत असते. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नेहमी आघाडी तोडण्याची भाषा करत असल्याचा आरोपही त्रिपाठींनी केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात आगामी विधासभा न‍िवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील 'घनिष्ठता' उफळून आली आहे. राष्ट्रवादीने कॉंग्रेसला निम्म्या जागा मागितल्या आहेत. मात्र, कॉंग्रसने राष्ट्रवादीची ही मागणी फेटाळली आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(संग्रहीत फोटो: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते डी.पी. त्रिपाठी )