आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP First List Of 18 Candidates Of The Party For LS Polls In Maharashtra

छगन भुजबळ, खासदार उदयनराजे भोसलेंसह राष्ट्रवादीचे 18 उमेदवार जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेस सोबत अनेक दिवस जागा वाटपाचा घोळ चालल्यानंतर राष्ट्रवादीला महाराष्ट्रात 22 जागा सोडण्यात आल्या आहेत. या सर्व जागांवर इच्छूकांची संख्या जास्त झाल्याने उमेदवार यादी जाहीर करण्यास विलंब लागत होता. आज (गुरुवार) पक्षाचे प्रवक्ते डी.पी.त्रिपाठी यांनी महाराष्ट्रातील 22 पैकी 18 जागांवरील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह विद्यामान खासदार उदयनराजे भोसले यांचा समावेश आहे. हिंगोली, बीड, मावळ आणि हातकणंगले या उर्वरीत चार जागांचे उमेदवार अजूनही राष्ट्रवादीने गुलदस्त्यात ठेवले आहेत. जाहीर 18 उमेदवारांपैकी अनेक नवीन उमेदवार देऊन शरद पवारांनी भाकरी फिरवली आहे. अमरावतीमध्ये नवनीत कौर यांना उमेदवारी देऊन अजित पवारांचाही यादीवर वरचष्मा असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.

विद्यमान आमदारांना लोकसभा लढवावी लागेल, त्यांनी तशी तयारी ठेवावी. असे अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादीकडून अतंर्गत बैठकांमध्ये सांगितले जात होते. यानुसार पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना आता लोकसभेत पाठवण्याची राष्ट्रवादीने तयारी केली आहे. समीर भुजबळ यांच्या ऐवजी नाशिकमधून भुजबळांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात आम आदमी पार्टीचे विजय पांढरे असणार आहेत. त्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेही त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.

हे आहे राष्ट्रवादीचे उमेदवार
बारामती - सुप्रिया सुळे
नाशिक - छगन भुजबळ
अमरावती - नवनीत राणा-कौर
सातारा - उदयनराजे भोसले
परभणी - विजय भांबळे
जळगाव - सतीश पाटील
कल्याण - आनंद परांजपे
भंडारा - प्रफुल्ल पटेल
माढा - विजयसिंह मोहिते पाटील
शिरुर - देवदत्त निकम
बुलढाणा - कृष्णराव इंगळे
उस्मानाबाद - पद्मसिंह पाटील
नगर - राजीव राजळे
कोल्हापूर - धनंजय महाडिक
दिंडोरी - भारती पवार
ठाणे - संजीव नाईक
रावेर - मनीष जैन
ईशान्य मुंबई - संजय दीना पाटील

पुढील स्लाइडमध्ये, अमरावतीच्या नवनीत कौर