आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पर्रीकरांच्या विधानामुळे माझ्या ज्ञानात नव्याने भर! राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा टोला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सर्जिकल स्ट्राइक्स यापूर्वी कधी झालेच नाहीत, या संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलेल्या विधानामुळे माझ्या ज्ञानात नव्याने भर पडली आहे. १९७१ च्या बांगलादेश युद्धाच्या वेळीही बहुदा संरक्षण खात्याचे नेतृत्व पर्रीकरांनीच केले असावे, असा अर्थ काढायला आता हरकत नाही, असा प्रतिटोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी मारला.
मराठा अारक्षणाबाबत पवार म्हणाले, ओबीसींना मिळणाऱ्या आरक्षणात मराठा समाजाने कधीही वाटा मागितलेला नाही. नाेकरी अाणि शैक्षणिक संधीत अारक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचा लढा अाहे. मराठा अारक्षणाकडे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी स्वत: लक्ष घालावे, त्यासाठी त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मराठा समाजातल्या गरिबांना शैक्षणिक सवलती मिळाल्या तर त्याचा थोडाच भार सरकारी तिजोरीवर पडेल. मात्र, नाेकऱ्यांमध्ये अारक्षणाचा निर्णय सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करून घ्यावा लागणार अाहे. यातून मार्ग काढावा यासाठी माझी पंतप्रधानांसाेबत चर्चा झाली आहे. शेतीमालाला याेग्य भाव मिळत नसल्याने शेती ताेट्यात अाहे. या मोर्चातून शेतकऱ्यांनी अापली अस्वस्थता व्यक्त केली आहे.
पवार म्हणाले, पंतप्रधानांशी बुधवारी झालेल्या भेटीत, साखर निर्यातीबाबतही चर्चा झाली. केंद्राने साखरेची निर्यात व साखर उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवर साठा मर्यादा लादण्याचे निर्णय घेतल्याने हा उद्योग अडचणीत आला आहे. उत्तर प्रदेश व महाराष्ट्र ही साखरेची प्रमुख उत्पादक दोन राज्ये देशात आहेत. महाराष्ट्राला आपली साखर प. बंगाल व ईशान्येकडील राज्यांना विकावी लागते. त्याचा खर्च अधिक अाहे. राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर प्रदेश अाणि गाेव्यात प्रत्येकी १० जागांवर निवडणूक लढविणार अाहे. उत्तर प्रदेशमध्ये नितीशकुमार यांच्यासाेबत युती करणार असल्याची माहितीही पवार यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...