आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारणाची दिशा समजून घ्यायची असेल तर पवारांसोबत काही वेळ घालवा -मोदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- शरद पवार यांनी राजकीय क्षेत्रात काम करीत असतानाही सहकार क्षेत्राकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. त्याच्या माध्यमातून सामाजिक बदल घडवून आणले. कोणत्याही गोष्टीच्या रचनात्मक उभारणीवर त्यांचा विशेष भर आहे. शेतकऱ्याला जसा हवामानाचा अंदाज असतो तसा शरद पवारांना राजकारणाचा अंदाज येतो. भारताचे राजकारण समजून घ्यायचे असेल तर त्यांच्यासोबत काही वेळ घालवावा लागेल, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
दिल्लीतील विज्ञान भवनात शरद पवार यांचा अमृतमहोत्सवी सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार, लालू प्रसाद यादव यांच्यासह अनेक मान्यवर मंचावर होते.
या कार्यक्रमाला लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन, कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगपती गौतम अदानी, अनिल अंबानी, राहुल बजाज, जया बच्चन, शबाना आझमी यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, खासदार, आमदार प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना शरद पवार म्हणाले, की आज माझ्यासाठी सौभाग्याचा दिवस आहे. सर्वांनी मला भरभरुन प्रेम दिले. देशाची सेवा करण्याची संधी मिळाली. संसदेच्या मर्यादा सांभाळून मी आजपर्यंत काम केले. कामकाज सुरु असताना कधी गोंधळ घातला नाही. वेलमध्ये जाऊन काम विस्कळित केले नाही. कृषी खात्याचे काम करताना विकासाचा आलेख नेहमी चढता ठेवला.

शरद पवार म्हणाले, की भारत हा कृषीप्रधान देश आहे. तांदूळ उत्पादनात देशाचा पहिला तर गव्हाच्या उत्पादनात दुसरा क्रमांक लागतो. माझे वडील शेतकरी होते. त्यामुळे शेतीचा वारसा लाभला आहे. देशात महिला शिक्षण आणि महिला सबलीकरणावर जोर देण्याची गरज आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, काय म्हणाल्या सोनिया गांधी... माजी पंतप्रधान मनमोहनसिंग.....