आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिस-या आघाडीच्या बैठकीमध्ये आज राष्ट्रवादीची हजेरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सत्ताधारी यूपीए आघाडी सरकारमध्ये महत्त्वाचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी दिल्लीत होणा-या तिस-या आघाडीच्या बैठकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या वतीने डी.पी. त्रिपाठी बैठकीला हजर राहतील. या आधारावर पक्षाला तिस-या आघाडीशी जोडणे बरोबर नाही. आमचा स्वतंत्र पक्ष आहे. कोणत्याही राजकीय बैठकीला आम्ही जाऊ शकतो, असे त्रिपाठी यांनी म्हटले आहे. काँग्रेस नेते पी.सी. चाको यांनी मात्र यावर भाष्य केलेले नाही. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी राहुल यांनी मंत्री होऊन प्रशासनाचा अनुभव घ्यायला हवा होता, असे या आधीच म्हटले होते.