आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एनडी तिवारींना ब्रेन स्ट्रोक; प्रकृती चिंताजनक, आयसीयू उपचार सुरु

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण दत्त तिवारी यांना ब्रेन स्ट्रोक आल्याने त्यांना दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिवारी यांची यांची प्रकृती च‍िंताजनक असून त्यांच्यावर अायसीयूमध्ये उपचार सुरु आहे, अशी माहीती त्यांची पुतणी मनिषी तिवारी यांनी दिली आहे.

91 वर्षीय तिवारी मागील काही दिवसांपासून आजारी आहेत. एनडी तिवारी यांची पत्नी उज्जवला आणि मुलगा रोहित शेखर हे दोघे सध्या त्यांची काळजी घेत आहेत. तिवारी यांनी तिनदा यूपी आणि एकदा उत्तराखंडचे मुख्यमंत्रिपद भुषवले होते.

अन् रोहित शेखरला स्विकारले...
- नारायण दत्त तिवारी यांनी रोहित शेखर याचा मार्च 2014 मध्ये मुलगा स्विकार केला होते. रोहित शेखर याने वडिलांचे नाव मिळवण्यासाठी सहा वर्षे कायदेशिर लढाई लढली होती.
- कोर्टाने अखेर आदेश दिल्यानंतर तिवारी यांना डीएनए टेस्टला सामोरे जावे लागला होते. त्यात रोहित शेखर हा त्यांचा मुलगा असल्याचे स्पष्ट झाले होते.
- नंतर तिवारी यांनी रोहितची आई उज्जवला शर्मा हिच्यासोबत विवाह केला होता.
- रोहित शेखर हा भाजपचा नेता आहे. तरी देखील तिवारी हे काँग्रेसमध्ये आहे.
बातम्या आणखी आहेत...