आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NDA Increases Its Seat, But For Power Expected More Struggle

रणधुमाळी निवडणुकीची: एनडीएच्या जागा वाढणार, सत्तेसाठी मात्र नाकी नऊ!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांत देशात उघडकीस आलेले घोटाळे आणि विविध आघाड्यांवरील वादांच्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत राष्‍ट्रीय लोकशाही आघाडी सर्वाधिक 197 जागा मिळवेल; मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांच्या नाकी नऊ येतील. कारण, सत्ताधारी यूपीएला फटका बसणार असला तरी 184 जागा ही आघाडी मिळवू शकेल. एका सर्वेक्षणाच्या अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

‘द वीक’ने हे सर्वेक्षण केले आहे. सत्ताधारी आणि विरोधी आघाड्यांमध्ये सत्तेसाठी काट्याची लढत होणार आहे, तर अपक्ष आणि इतर 162 जागा घेऊन त्रिशंकू पेचाला टेकू देण्याचा प्रयत्न करतील, असा सर्वेक्षणाचा होरा आहे.
लोकसभा निवडणुकीला आणखी एक वर्ष आहे. मात्र, काँग्रेस व भाजप या प्रमुख पक्षांसह सर्वांनीच जोरदार तयारी सुरू केली आहे. ‘आप’च्या रूपाने अरविंद केजरीवालांसारखी मंडळी पण यंदा संपूर्ण शक्तीनिशी निवडणुकीत उतरणार असून अण्णा हजारेंसारखे सामाजिक नेतेही ऐन प्रचाराच्या काळात तयारीनिशी आपली आंदोलने चालवण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत नेमका कोणता पक्ष किंवा आघाडी बाजी मारू शकते, याबद्दल सामान्य लोकांत प्रचंड उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर ‘द वीक’ने हे सर्वेक्षण केले.

मोदींना सर्वाधिक पसंती
निवडणुकीनंतर पंतप्रधान कोण, या प्रश्नावर जनतेने नरेंद्र मोदी यांना 32 टक्के लोकांनी पसंती दर्शवली तर डॉ. मनमोहनसिंग यांना दुसरी पसंती मिळाली. राहुल गांधी यांना 13 टक्के पसंती मिळाली आहे.

>26.7 टक्के मते एनडीएला
>गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 3.4 % अधिक
>31.7 टक्के मते यूपीएला
>गेल्यावेळच्या तुलनेत 5.5 % कमी
>एनडीएला 2009 मध्ये 23.3 टक्के तर काँग्रेस आघाडीला 37.2 टक्के मते मिळाली. अपक्ष व इतरांना या वेळी 2.1 >टक्के अधिक म्हणजे 41.6 टक्के मते मिळू शकतात.

सोनियांपेक्षा अडवाणी मागे!
यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांना पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून केवळ 8 टक्के लोकांनी पसंती दिली. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पंतप्रधान व्हावे असे वाटणारे सर्वेक्षणानुसार केवळ 5 टक्के लोक आहेत.
त्यांच्याइतकीच पसंती मायावती यांना मिळाली आहे. मुलायमसिंह यादव यांना चार टक्के, तर ममता बॅनर्जी यांना तीन टक्के लोकांनी भावी पंतप्रधान म्हणून पसंती दिली आहे.