आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणकडून तेलाची आयात केल्‍यास परकीय चलनात मोठी बचत शक्‍य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- इंधनाचे वाढते दर आणि परकीय चलनावर वाढता खर्च नियंत्रणात आणण्‍यासाठी पेट्रोलियम मंत्री वीरप्‍पा मोईली यांनी इराणकडून कच्‍च्या तेलाची आयात वाढविण्‍याचा सल्‍ला दिला आहे. इराणकडून आयात वाढविल्‍यास वित्तीय तूट कमी होण्‍यास मदत होईल तसेच परकीय चलनाचीही मोठ्या प्रमाणात बचत करता येईल, असे मोईली यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना लिहीलेल्‍या पत्रात म्‍हटले आहे.

रुपयाचे विक्रमी अवमुल्‍यन झाल्‍यामुळे महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली आहे. स्‍वयंपाकाचा गॅसही महागणार आहे. इंधनाच्‍या आयातीवर देशाचे बरेच परकीय चलन खर्च होते. त्‍यामुळे मोईली यांनी यासंदर्भात उपाय सुचविला आहे. पंतप्रधानांना लिहीलेल्‍या पत्रात त्‍यांनी सांगितले, की चालू आर्थिक वर्षाच्‍या उर्वरित कालावधीत इराणकडून 11 मिलियन टन कच्‍च्‍या तेलाची आयात करण्‍यात येईल. आतापर्यंत इराणकडून केवळ 2 मिलियन टन तेलाचीच आयात करण्‍यात अली आहे. ही आयात वाढविल्‍यास 8.47 बिलियन्‍स अमेरिकन डॉलर्सची बचत होऊ शकते, असे मोईलींनी म्‍हटले आहे.

कशी शक्‍य आहे ही बचत? वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...