आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनडीटीव्हीवरील बंदी केंद्राकडून स्थगित, सर्वाेच्च न्यायालयात धाव घेताच बदलला निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एनडीटीव्हीने आपल्या हिंदी वृत्तवाहिनीवर लावण्यात आलेल्या एक दिवसाच्या प्रसारण बंदीविरोधात सर्वाेच्च न्यायालयात धाव घेताच केंद्र सरकारने या बंदीला स्थगिती दिली आहे. एनडीटीव्ही इंडियाला ९ नोव्हेंबरला प्रसारण रोखण्याचा आदेश बजावला होता. एनडीटीव्हीची याचिका निकाली निघेपर्यंत ही स्थगिती राहील, असे सूत्रांनी सांगितले.

जानेवारीत पठाणकोट हवाई तळावरील अतिरेकी हल्ल्यावेळी संवेदनशील माहिती दाखवल्याच्या आरोपावरून ही बंदी लादली होती. वाहिनीने या आराेपांचे खंडन केले आहे. या बंदीचा सार्वत्रिक विरोध होत आहे.
बातम्या आणखी आहेत...