आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार लाखांपर्यंतच्या उत्पन्न वाढीची गरज, २ दशके अविरत काम करणे गरजेचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या मते देशातील दारिद्र्य नष्ट करायचे असेल तर दरडोई उत्पन्नात ४ लाखांपर्यंत वाढ करण्याची गरज आहे. भारत आजही प्रतिव्यक्ती वार्षिक १ लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांचा देश आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेची स्थिती फारशी बळकट नसल्याचे ते म्हणाले.

सिंगापूरचे दरडोई उत्पन्न ३३.३२ लाख रुपये आहे. त्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या भारत पिछाडीवर आहे. अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे. प्रत्येक व्यक्ती किमान ४ ते ४.६७ लाख रुपये इतक्या वार्षिक उत्पन्नाची अपेक्षा करते. याची अंमलबजावणी झाली तरच भयंकर दारिद्र्याशी लढणे शक्य आहे. यात सुधारणा हवी असेल तर किमान दोन दशके आपल्याला चांगले काम करावे लागेल. सध्या सर्व मुद्दे महागाई रोखणे आणि बँक बॅलन्सशीट सुधारण्याशी संबंधित असल्याचे राजन यांनी सांगितले. भावी काळात देशातील गरिबात गरीब घटकाला अर्थप्रणालीशी जोडण्याचे काम हाती घ्यावे लागेल. कानाकोपऱ्यात बँकिंग प्रणाली रुजवावी लागेल. पेमेंट बँकांची स्थापना, युनिफाइड पेमेंट इंटरफेस आणि भारत बिल पेमेंट सिस्टिमसारखे मुद्दे यात सामील आहेत. आरबीआय गव्हर्नर राजन यांनी सांगितले की, बाजार व्यवस्थेत आणखी उदारीकरण आणल्यास परकीय अर्थव्यवस्थेवर देशाची अर्थव्यवस्था अधिक अवलंबून राहण्याचा धोका संभवतो. बाह्य चढ-उतारांचा धोका उद्भवू नये यासाठी उदारीकरणाला मर्यादा घालणे आवश्यक असते. जागतिक बाजारपेठ सामान्य असतानाही आपण अधिक उदारीकरण आणण्याच्या स्थितीत येण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...