आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवादाविरुद्ध एकजुटीची गरज : मुखर्जी; टर्नबुल यांनी केली राष्ट्रपतींशी चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जगाच्या सर्वच कानाकोपऱ्यातून दहशतवादाची पाळेमुळे खणून काढायला हवीत आणि जगातील शांतताप्रेमी राष्ट्रांनी याबाबत कृती करावी, असे आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी येथे केले आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांनी राष्ट्रपती भवनात त्यांची भेट घेतली त्या वेळी बोलताना मुखर्जी असे म्हणाले होते.  

या वेळी मुखर्जी पुढे म्हणाले की, आम्ही रोजच दहशतवादाला तोंड देत आहोत. या दिशेने ऑस्ट्रेलिया करत असलेल्या प्रयत्नांचे भारत समर्थन करतो आहे. भारताचा अणुकार्यक्रम हा नेहमीच शांततामय कार्यक्रमासाठी, ऊर्जानिर्मितीसाठीच होता आणि आहे. त्यामुळेच भारत समृद्ध युरेनियम पुरवठ्यासाठी ऑस्ट्रेलियाकडे आशेने पाहतोय, असेही ते म्हणाले. 

मेक इन इंडिया कॉन्फरन्स अँड इन्व्हेस्ट इन इंडिया कॉन्फरन्स  
मेक इन इंडिया परिषद आणि भारतातील गुंतवणूक परिषदेची आखणीच गुंतवणूक वाढावी हा हेतू, ठेवूनच केली आहे, असेही राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...