आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NEET: आज नीट परीक्षा, मेटल डिटेक्टरने होणार तपासणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशभरातील वैद्यकीय व दंतवैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट-यूजी) - २०१७ रविवारी होत आहे. सीबीएसईने या महत्त्वाच्या परीक्षेसाठी औरंगाबादसह देशभरात ८४ शहरांत परीक्षा केंद्रे ठेवली आहेत. नकलांना आळा घालण्यासाठी सीबीएसईने या वेळीही इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह व्यापक तयारी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या वेळी सीबीएसईने २५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची सवलत दिली आहे.

विद्यार्थ्यांची कडक सुरक्षा तपासणी होईल. सर्व केंद्रांवर मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी होईल. विद्यार्थिनींच्या तपासणीसाठी महिला कर्मचारी असतील. परीक्षा केंद्रात कोणतीही सामग्री नेता येणार नाही. 

कपड्यांबाबत विशेष सूचना:
नीट परीक्षेसाठी सीबीएसईने विद्यार्थ्यांनी परिधान करावयाच्या कपड्यांबाबत कठोर नियम बनवले आहेत. विद्यार्थिनी परीक्षेत साडी घालून तसेच मेंदी लावून येऊ शकणार नाहीत. विद्यार्थ्यांना हवाई चप्पल किंवा सँडल, हाफ बाह्यांचे टी-शर्ट किंवा शर्ट, ट्राऊझर, लेगिंग्स, लोवर, प्लाझो, हाफ बाह्याची कुर्ती, टॉप घालता येईल. मोठ्या बटणाचे किंवा फुलांचे चित्र असलेल्या कपड्यांवर बंदी आहे.

मंगळसूत्र घालण्यावर बंदी नाही:
या परीक्षेसाठी विवाहित महिलांना मंगळसूत्र घालण्याची परवानगी आहे. मात्र, बुरखा किंवा साडी परिधान करता येणार नाही. ताईत, ब्रेसलेट, कृपाणसारख्या वस्तू जवळ बाळगता येणार नाहीत. शिवाय पर्स, क्रेडिट-डेबिट कार्ड, लॉकेट, बूट, पूर्ण बाह्यांचे शर्ट, घड्याळ, उन्हापासून बचाव करणारे चष्मे, हेअरक्लिप, रबरबँड, बेल्ट, बांगड्यासुद्धा घालता येणार नाही.

नीटसाठी खास पेन
नीटसाठी सीबीएसईने खास पेन तयार केला असून परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्र दाखवल्यानंतर हा पेन विद्यार्थ्याला दिला जाईल. हा पेन फक्त नीट परीक्षेसाठीच तयार करण्यात आला असल्याने बाजारात कुठेही मिळणार नाही.

यंदा 41 टक्के अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी
यंदा नीट परीक्षेसाठी 11,35,104 विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या 41.42 टक्क्यांनी जास्त आहे. मागच्या वेळी 8,02,594 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...