आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वातंत्र्यानंतर नेहरूंचे विकासाचे मॉडेल फेल, जेटलींची टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई / दिल्ली - ‘स्वातंत्र्यानंतर काळात नेहरू मॉडेमुळे विकास थांबला होता. इतकेच नव्हे तर अर्थव्यवस्थेचे उदारीकरण करणारे काँग्रेसचे नेते व माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव हेही आर्थिक देवदूत नव्हते.’ असे परखड मत व्यक्त करत केंद्रीयमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसच्या विकासाच्या मॉडेलवर टीका केली.

मुंबईत जीएसटीवर आयोजित एका चर्चासत्रात ते बोलत होते. जेटली म्हणाले, “विकासाचे नेहरू मॉडेल स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या दशकांत एक ते दोन टक्के विकासदरही साध्य होऊ शकला नाही. त्या वेळी जागतिक विकास दर २.५ टक्के होता. जपा, कोरिया, तैवानसारख्या देशांनी तंत्रज्ञानाच्या जोरावर विकासाचे लक्ष्य साध्य केले. पण भारतातील विकास मात्र थांबला होता. येथे त्या वेळी १ टक्क्यांपेक्षा कमी लोकांकडे फोन होते. तरीही काही लोक या विकासाच्या मॉडेलचे कौतुक करतात,’ असा टोला त्यांनी काँग्रेसेच नाव न घेता लगावला.

जेटली म्हणाले, त्या वेळी देशात ज्या काही आर्थिक सुधारणा केल्या, त्या नाइलाजास्तव करण्यात आल्या होत्या. तर १९९१ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणा आर्थिक दिवाळखोरीमुळे कराव्या लागल्या होत्या.
जेटलींच्या विधानावर काँग्रेसने केली टीका
अरुण जेटली यांनी केलेल्या टीकेला काँग्रेसच्या गोटातून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते आनंद शर्मा म्हणाले की, अरुण जेटली जे तथ्य सत्य म्हणून मांडत आहे ते चुकीचे तसेच वस्तुस्थिती तोडून मोडून सांगत आहेत. सध्याच्या मोदी सरकारला वारसा रुपाने आर्थिकदृष्ट्या मजबूत अर्थव्यवस्था मिळाली आहे. परंतु हा चांगला व सक्षम वारसा हे सरकार नीटपणे का सांभाळू शकले नाही, हे त्यांनी सांगावे. विकास दर सध्या घसरणीला लागून कमाल पातळीपर्यंत खाली आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका कार्यक्रमात काँग्रेसवर टीका केली होती. तेव्हापासून मोदी सरकार काँग्रेस व विरोधकांच्या निशान्यावर आहे.
बातम्या आणखी आहेत...