आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nepal Earthquake: With Aid Not Getting Through Relief Trucks Looted In Nepal

आसाम, नागालॅंडसह ईशान्य भारत हादरला, पीडितांनी लुटले सामग्रीचे ट्रक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/काठमांडू- नेपाळसह आसाम, नागालॅंड आणि ईशान्य भारतातील काही राज्ये भूकंपाच्या धक्क्याने हादरले. मध्यरात्री दीडच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.7 एवढी नोंदवण्यात आली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे अद्याप वृत्त नाही. दुसरीकडे, नेपाळमधील भूकंपात मरण पावणार्‍यां नागरिकांची संख्या 6,200 च्या वर पोहोचली आहे. तब्बल 14 हजार नागरिक जखमी झाले आहेत.

पाऊस आणि खराब हवामानामुळे बचावकार्यात अनेक अडथळे येत आहेत. दरम्यान नेपाळमध्ये एनडीआरएफ आणि लष्कराकडून सुरु असलेल्या बचावकार्याचा आढावा घेण्यासाठी परराष्ट्र सचिव एस.जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभल काठमांडूला भेट देणार आहेत.


भूकंपग्रस्ताना वेळेवर मदत मिळत नसल्याने ते संतापले आहेत. संतप्त भूकंपग्रस्तांनी रस्त्यावरच खाद्यसामग्रीचे ट्रक लुटल्याची माहिती समोर आली आहे. विध्वंसकारी भूकंपामुळे अनेकांना बेघर व्हावे लागले असून त्यांचे संसार रस्त्यावर आले आहेत. त्यात पुरेशी मदत मिळत नसल्याने सिंधुपाल चौक येथील भूकंपग्रस्त संतापले आहेत. संतप्त भूकंपग्रस्तांनी रस्त्यावरच खाद्य सामग्रीचे ट्रक लुटल्याची घटना समोर आली आहे. गरजू लोकांपर्यंत मदत न पोहोचल्याने त्यांनी हे पाऊल उतरलेले आहे. हजारो टन खाद्यसामग्री एअरपोर्ट आणि मदत शिबिरात अडकून पडली आहे.

खराब हवामानाचा मदत कार्याला अडसर, मृतांचा आकडा 15 हजारवर जाणार
25 एप्रिलला आलेल्या भीषण भूकंपामुळे नेपाळ उद्‍धवस्त झाले आहे. काठमांडूला सर्वाधिक नूकसान झाले आहे. नागरिकांमध्ये भूकंपामुळे प्रचंड भीती पसरली आहे. भूकंपग्रस्त खुल्या मैदानावर रात्र काढतात. त्यात खराब हवामानाचा मदत कार्यावर मोठा परिणाम झाला आहे. मदतकार्यात मोठा अडथडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बहुतांश भागात मदत पोहोचलेली नाही.
मृतांचा आंकडा 10 ते 15 हजारांवर जाईल, अशी शक्यता नेपाळचे लष्करप्रमुख जनरल गौरव राणा यांनी व्यक्त केली आहे. सिंधुपाल चौक हे काठमांडूपासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. परंतु खराब रस्त्यामुळे त्यांना वेळेत मदत पोहोचणे कठीण झाले आहे. सिंधुपालचौक येथे गुरुवारपर्यंत मृतांचा आकडा 1700 वर पोहोचला आहे. अनेक मृतदेह अजूनही ढिगार्‍याखाली अडकले आहेत. मृतदेह बाहेर काढण्यासाठी मनुष्यबळ तसेच साधनांचा अभाव जाणवत आहे.

स्थानिक मीडियाने दिलेल्या अहवालानुसार, सिंधुपालचौक येथील भूकंपग्रस्ताना अद्याप मदत पोहोचलेली नाही. त्यामुळे ते संतपाले आहेत. संतप्त भूकंपग्रस्तांनी खाद्यसामग्री भरलेले तीन ट्रक लुटले आहेत. सिंधुपालचौक हे दुर्गम भागात असल्याने पुढील काळात अशा घटना वाढतील, अशी शक्यता बचाव पथकाने व्यक्त केले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, नेपाळमधील दाहकता दर्शवणारी ताजी छायाचित्रे...