आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळच्या राष्ट्रपतींचे राष्ट्रपती भवनावर मुखर्जी, मोदींकडून स्वागत ; सेरेमोनियल रिसेप्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेपाळच्या राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. - Divya Marathi
नेपाळच्या राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.
नवी दिल्ली - नेपाळच्या राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी यांचे मंगळवारी भारताच्या राष्ट्रपती भवनावर आगमन झाले. यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले. राष्ट्रपती भंडारी येथे मुखर्जी आणि मोदींसह विविध मान्यवरांच्या भेटी घेणार आहेत. 
उपराष्ट्रपती हमीद अंसारी, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अर्थमंत्री अरुण जेटली सुद्धा भंडारी यांची भेट घेणार आहेत. यासोबतच, नेपाळच्या राष्ट्रपती एका औद्योगिक संमेलनात सुद्धा सहभागी होणार आहेत.
 
राष्ट्रपती भवनावर सेरेमोनियल रिसेप्शन
नेपाळच्या राष्ट्रपती भंडारी यांना राष्ट्रपती भवनात सेरेमोनियल रिसेप्शन दिले जाणार आहे. यासोबतच, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यातर्फे सन्मान म्हणून स्टेट बँकेट सुद्धा आयोजित करण्यात आले आहे. 
 
5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर
नेपाळच्या राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी यांचे नवी दिल्लीत सोमवारीच आगमन झाले. त्या 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासमवेत नेपाळच्या मंत्र्यांचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ सुद्धा भारतात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि नेपाळच्या परराष्ट्र संबंधांमध्ये चढ-उतार पाहता राष्ट्रपती भंडारी यांचा दौरा मत्वाचा मानला जात आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...