आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मोठ्या भावा’ सारखे नव्हे, समानतेने वागा :सत्ताधारी पक्षाने भारताला सुनावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारताने आमच्याशी ‘मोठ्या भावा’ सारखे वागलेले चालणार नाही. त्याऐवजी भारताने द्विपक्षीय संबंध नीटपणे सांभाळले पाहिजेत, असे सत्ताधारी नेपालीज सीपीएन पक्षाने स्पष्ट केले आहे.

सीपीएन (यूएमएल) पक्षाचे सरचिटणीस प्रदीप ग्यावाली म्हणाले, नरेंद्र मोदी सरकारने अलीकडे आपल्या भाषणात नेपाळला प्राधान्य देत असल्याची म्हटले होते. परंतु वास्तविक भारताला जागतिक राजकारणात आपली भूमिका निभावण्याची इच्छा आहे. त्यामुळेच भारताने शेजारी देशांबरोबरचे संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ग्यावाली बोलत होते. आम्हाला भारतासोबतचे संबंध पूर्णपणे समानतेवर आधारित हवे आहेत. मोठा भाऊ म्हणून भारताने आमच्याशी व्यवहार करू नये. कोणतेही संबंध समानतेच्या तत्त्वावर आधारलेले असावेत, असे ग्यावाली यांनी म्हटले आहे.भारत ही उदयोन्मुख शक्ती आहे. परंतु अगोदर भारताला शेजारी देशांबरोबरचे संबंध सुधारावे लागतील. अन्यथा भारताच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतात किंवा त्याला आव्हान दिले जाऊ शकते. म्हणूनच केंद्र सरकारने अगोदर आपले मूल्यमापन करावे.

बाजारपेठ भारतच
चीनने भूकंपानंतर काही क्षेत्रात मदत केली आहे. परंतु त्यांचा राजकीय क्षेत्रात हस्तक्षेप मुळीच नाही. भारत-नेपाळ संबंधाची बरोबरी चीनशी होऊ शकत नाही. नेपाळमध्ये तयार होणाऱ्या जलऊर्जेसाठी भारत हीच एकमेव बाजारपेठ आहे. चीन नव्हे. त्याशिवाय सांस्कृतिक, लोकसंपर्काच्या पातळीवरही भारताशी घनिष्ठता आहे, असे सत्ताधारी पक्षाने मान्य केले.