आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत नेपाळला देणार दीड कोटी डॉलर,

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारत आणि नेपाळ यांच्यात शुक्रवारी परस्पर संबंध वृद्धिंगत करण्यासाठी करार झाले. भारताने नेपाळला भूकंपातून पुन्हा उभे राहण्यासाठी मदत म्हणून दीड कोटी डॉलर देण्याचे तसेच व्यापार वाढवण्याचे आश्वासन दिले. दुसरीकडे, नेपाळनेही तेथील नव्या राज्यघटनेत तेथे राहत असलेल्या भारतीयांसह सर्व वर्गांच्या आकांक्षेनुसार समावेशी रूपात ती लागू करण्याचे आश्वासन दिले.

नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल (प्रचंड) गुरुवारपासून चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांची आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दोन तास बैठक झाली. मोदी म्हणाले की, ‘सर्वात जवळचा शेजारी असल्याने नेपाळची शांतता, स्थैर्य आणि समृद्धी यातच भारताचेही हित आहे. आपण चांगल्या-वाईट काळात एकमेकांना सहकार्य केले आहे, ते पुढेही सुरूच राहील.’ त्यावर प्रचंड म्हणाले की, आमच्या देशाजवळ भारतासाठी शुभेच्छांशिवाय काहीही नाही. दोन्ही देशांचे नशीब एकमेकांशी जोडलेले आहे.दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पुष्पकमल प्रथमच भारतात आले आहेत.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नवी राज्यघटना स्वीकारल्यानंतर नेपाळला राजकीय आव्हानांचा सामना करावा लागत आहे. भारतीय वंशाच्या मधेशींनी नव्या राज्यघटनेला विरोध केला होता. आपल्याला बाजूला फेकण्यात येईल, अशी भीती त्यांना वाटत होती. त्याचा परिणाम भारत-नेपाळच्या संबंधांवरही झाला होता.
बातम्या आणखी आहेत...