आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्राने ‘नेस्ले’वर ठोकला ६४० कोटी रुपयांचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मॅगीच्या फसव्या जाहिराती आणि व्यावसायिक नियमांचे उल्लंघन केल्याने केंद्र सरकार मॅगी उत्पादन करणाऱ्या नेस्ले कंपनीवर ४२४ कोटी रुपयांचा दावा ठोकणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालय लवकरच नेस्लेच्या विरोधात राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगापुढे (एनसीडीआरसी) हा दावा दाखल करेल.
तीन दशकांपासून अस्तित्वात असलेल्या ग्राहक संरक्षण कायद्याचा आधार घेऊन पहिल्यांदाच एखाद्या कंपनीच्या विरोधात दावा दाखल होईल. ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी त्याला मंजुरी दिली आहे. मॅगी नूडल्समध्ये अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन करण्यात आले असून हा ‘गंभीर मुद्दा’आहे, अशी टिप्पणी पासवान यांनी केली होती. या प्रकरणी तपास आणि योग्य कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटले होते.

बहुतांश प्रकरणांत ग्राहकाने तक्रार दाखल केल्यानंतरच एनसीडीआरसी कारवाई करते. पण १९८६ च्या या कायद्यातील एका कलमानुसार सरकारही अशी तक्रार दाखल करू शकते.