आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेस्ले अाता स्वतः ग्राहकांच्या घरातून घेऊन जाणार मॅगीचे पॅकेट!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः नेस्ले कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.) - Divya Marathi
(फोटोः नेस्ले कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.)
नवी दि‍ल्‍ली- अवघ्या दोन मिनिटांत तयार होणार्‍या 'मॅगी नूडल्स'मध्ये हानिकारक पदार्थ आढळल्याने नेस्ले कंपनी वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. भारतात मॅगी नूडल्सवर बंदी घातली आहे. दुसरीकडे, नेस्ले आता स्वत: ग्राहकांच्या घरातून मॅगीचे पॅकेट घेऊन जाणार आहे. विशेेष म्हणजे ग्राहकांना रिफंड देखील मिळणार आहे. नेस्लेने एक जाहिरात प्रसिद्ध करून ही माहिती दिली आहे. 'आम्हाला तुमच्या विश्वासापेक्षा जास्त काही महत्त्वाचे नाही.', असेही नेस्‍लेने आपल्या जाहिरातमध्ये म्हटले आहे.
कसे परत करला कंपनीला मॅगी पॅकेट
तुमच्या घरात मॅगीचे पॅकेट अजून शिल्लक असतील तर तुम्ही ते कंपनील परत करू शकतात. मॅगीचे पॅकेट परत करण्यासाठी https://www.maggi.in/return/ वर क्लिक करून आपली माहीती देऊ शकतात. तसेच consumer.services@in.nestle.com वर ईमेल करून अथवा 18002661188 टोल फ्री क्रमांकावर फोन करून तुमच्याकडे शिल्लक असलेल्या मॅगी पॅकेटविषय तुम्ही माहिती देऊ शकतात. यानंतर कंपनीचा एक एक्झिकेटिव्ह तुमच्या घरी येऊन मॅगीचे पॅकेट घेऊन जाणार आहे. विशेेष म्हणजे तुम्हाला रिफंड सुद्धा देईल.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, 320 कोटी रुपयांची मॅगी नूडल्स नष्ट होणार