आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nestle Takes Maggi Off The Shelves News In Marathi

वादात सापडलेली \'मॅगी\' बाजारातून होणार \'गायब\', नेस्लेने जाहीर केला निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 'मॅगी' नूडल्सविषयी सध्या देशभरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोनोसोडियम ग्लुटामेट आणि शिसे यांचे प्रमाण निर्धारित निकषांपेक्षा अधिक आढळल्याने केंद्र सरकारने नेस्ले कंपनीवर कारवाईचा बगडा उगारला आहे. या पार्श्वभूमीवर नेस्ले कंपनीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, तो म्हणजे 'मॅगी' देशभरातील बाजारातून काढून घेण्यात येणार असल्याचे नेस्ले कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पॉल बुल्के यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

भारतात मॅगी खाण्यासाठी सुरक्षित आहे. मॅगीमध्ये आम्ही एमएसजी वापरत नाही. परंतु नूडल्समध्ये एसएसजी कसे मिसळले गेले याचा तपास सुरु असल्याचे 'नेस्ले' कंपनीचे सीईओ पॉल बुल्के यांनी यावेळी म्हटले आहे. भारतीय बाजारातून 'मॅगी'चे उत्पादन काढून घेतल्याचा निर्णय आम्ही घेतला असला तरी लवकरच 'मॅगी'च्या विक्रीला पुन्हा सुरवात होईल, असा विश्वास देखील पॉल बुल्के यांनी व्यक्त केला आहे.

दुसरीकडे, फूड सेफ्टी अॅण्ड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाने (FSSAI) 'मॅगी'चे नऊ प्रकार असुरक्षित असून ते आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकाराने नेस्ले कंपनीवर कठोर कारवाईचा बगडा उगारत FSSAIला 'मॅगी'चे उत्पादन तसेच विक्रीवर तत्काळ बंदी घालण्याचे आदेश दिले आहे. तसेच बाजारातून 'मॅगी'चे पॅकेट्‍स काढून घेण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, निश्चित मर्यादेपेक्षा 17 पटींनी अधिक प्रमाणात मोनोसोडियम ग्लुटामेट आणि शिसे आढळलेली 'मॅगी' आरोग्यास घातक असल्याचे लष्करातील जवानांनी म्हटले आहे. मॅगी खाऊ नये, असा सल्लाही दिला आपल्या जवानांनी दिला आहे. सीएसडी कँटीनमध्ये विक्रीवर बंदीही घातली. दिल्ली सरकारने मॅगी नूडल्स विक्रीवर पंधरा दिवसांसाठी बंदी घातली आहे, तर देशभरातील बिग बाजारच्या स्टोअरमध्ये मॅगीची विक्री थांबवण्यात आली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, 'मॅगी'च्या ब्रँड अॅम्बेसेडर्सवर गुन्हे