आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Netaji Carried His Treasure On Final Voyage To Struggle From The Soviet Union

नेताजींसोबत अखेरच्‍या प्रवासात होते 80 किलो सोन्‍याचे दागिने, मिळाले केवळ 11 किलो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 9 ऑक्‍टोबर 1978 ला पहिल्‍यांदा भारतीय अधिका-यांनी एक ब्रिफकेस उघडली होती. त्‍यामध्‍ये जळालेल्‍या अवस्‍थेत सोन्‍याच्‍या दागिन्यांचे 14 पाकीटं होते. त्‍यामध्‍ये 11 किलो सोन्‍याची दागिने मिळाली होती. असेही म्‍हटले जाते की, ही ब्रिफकेस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्‍या 18 ऑगस्‍ट, 1945 च्‍या प्रवासात सोबत होती.
काय खास आहे या दागिन्‍यांमध्‍ये...
- नरेंद्र मोदी यांनी 23 जानेवारीला नेताजींसदर्भातील 100 फाइल जारी केल्‍या होत्‍या.
- त्‍यापैकी एक फाइल नंबर- 25/4/NGO-Vol 3 मध्‍ये नेताजींच्‍या संपत्तीविषयीची माहिती आहे.
- रेकॉर्डनुसार, नेताजी सुमारे 80 किलो सोन्याचे दागिने घेऊन प्रवास करत होते. 1945 मध्‍ये त्‍याची किंमत सुमारे 1 कोटी रूपये होती.
- प्लेन क्रॅशमध्‍ये नेताजींचे साहित्‍य जळाले होते. त्‍याचे काही वाचलेले भाग जपानमध्‍ये पाठवण्‍यात आले होते.
- 1952 मध्‍ये हे सामान जपानमधून भारतात आणण्‍यात आले. त्‍यामध्‍ये केवळ 11 किलो दागिने मिळाले होते.
इतिहासकार काय म्‍हणतात?
- ह्यू तोये नावाचे इतिहासकार यांच्‍या मतानुसार, बोस यांची इच्‍छा होती की, आझाद हिंद सरकारने जपानी सैनिकांकडून कमीत कमी मदत घ्‍यावी.
- त्‍यांनी जपानींकडून जिंकलेल्‍या ब्रिटिश कॉलनीमध्‍ये राहणा-या 20 लाख भारतीयांकडून मदत घेतली.
- यावेळी महिलांनी आयएनएला दागिने दान केले होते.
- 21 ऑगस्‍ट, 1944 ला रंगूनमध्‍ये एका कार्यक्रमात हीराबेन बेतानी नावाच्‍या महिलेने तिचे 13 नेकलेस दान केले होते.
- बोस हे लोकांनी दान केलेले 80 किलो सोन्‍याचे दागिने घेऊन प्लेनमध्‍ये बसले होते.
पुढील स्‍लाइडवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो..