आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेताजींशी संबंधित 100 गोपनीय फायली आज खुल्या होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित १०० गोपनीय फायली खुल्या केल्या जाणार आहेत. नेताजींच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी या फायली जारी करतील. पहिल्या टप्प्यात १०० फायली खुल्या होतील. त्यानंतर दर महिन्याला २५-२५ फायली खुल्या केल्या जातील.
दरम्यान, या फायलींमधील काही पत्रे ‘भास्कर’ला मिळाली आहेत. त्यात २७ डिसेंबर १९४५ ला जवाहरलाल नेहरू यांनी इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान क्लेमंट अॅटली यांना लिहिलेले पत्र आहे. त्यात नेहरूंनी नेताजींना ‘वॉर क्रिमिनल’ संबोधले होते. नेहरूंनी या पत्रात लिहिले होते की, ‘सुभाषचंद्र बोस जे तुमचे युद्ध गुन्हेगार आहेत, त्यांना स्टॅलिनने रशियन सीमेत दाखल होण्याची परवानगी दिली आहे, अशी माहिती माझ्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. रशिया ब्रिटिश-अमेरिकन आघाडीचा मित्र देश आहे. त्यामुळे रशियाने स्पष्टपणे विश्वासघात, धोका केला आहे. रशियाने असे करावयास नको होते. आपण याची दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी.’ ‘भास्कर’ने या पत्राची पडताळणी केली तेव्हा समजले की हे पत्र नेताजींच्या मृत्यूच्या चौकशीसाठी स्थापन खोसला समितीसह अनेक समित्यांसमोर ठेवण्यात आले होते आणि ते पब्लिक डोमेनमध्ये होते. ‘भास्कर’ने विचारणा केली असता पीएमओच्या सूत्रांनी त्याला दुजोरा दिला. आतापर्यंत दुजोरा न मिळालेले हे पत्र अधिकृत दस्तऐवजाच्या रूपात जाहीर केले जात आहे. पहिल्यांदाच या दस्तऐवजांवर गृहमंत्र्यांच्या प्रमाणिकरणानंतर पंतप्रधानांनी स्वाक्षरी केली आहे. म्हणजेच आता ही कागदपत्रे सरकारी दस्तऐवज म्हणून सादर केली जातील. असेच एक ५८ क्रमांकाचे पत्रही मिळाले आहे. त्यात ब्रिटिश शासित भारत सरकारचे ‘मेंबर होम’ आर. एफ. मूडी यांची नोट आहे. हे पत्र २३ ऑगस्ट १९४५ ला लिहिण्यात आले होते. त्यात नेताजींपासून रशियाला धोका असल्याची शंका व्यक्त होत होती. त्याचा मुकाबला करण्यासाठी दोन पर्याय देण्यात आले होते.ते म्हणजे नेताजींना भारताशिवाय दुसरीकडे पाठवावे किंवा भारतात सुनावणीनंतर मृत्युदंड देणे. ही नोट व्हाॅइसरॉयने इंग्लंडच्या मंत्रिमंडळात सादर केली होती.
नेताजींशी संबंधित गोपनीय फायली सार्वजनिक केल्या जातील, अशी घोषणा मोदींनी गेल्या वर्षी १४ ऑक्टोबरला केली होती. पीएमओने पहिल्या ३३ फायली ४ डिसेंबरला राष्ट्रीय पुराभिलेखाकडे सोपवल्या होत्या. त्याशिवाय काही फायली गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयानेही खुल्या करून पुराभिलेखाला दिल्या होत्या.
पुढील स्‍लाइडवर क्‍लिक करून पाहा, नेहरूंनी अॅटलींना लिहिलेले पत्र..