आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Netaji\'s Driver Col Nizammudin The Oldest Man Alive Opens Joint Bank Account With Wife At 116 Years

नेताजींवर झाला होता प्राणघातक हल्ला, 116 वर्षीय ड्रायव्हर निझामुद्दीन यांचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पहाटे उठल्या उठल्या दूध, दुपारी व संध्याकाळी साजूक तुप व डाळ-भात, रात्री झोपण्याआधी दूध असा खुराक एका तरुणाचा असेल तर आश्चर्य वाटायला नको. मात्र हा खुराक आहे आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ड्रायव्हर असल्याचा दावा करणारे सेफुद्दीन उर्फ 'कर्नल' निझामुद्दीन यांचा. निझामुद्दीन यांचे वय 116 वर्षे आहे.

निझामुद्दीन आज जगातील सर्वात वयोवृद्ध पुरुषांच्या शर्यतीत आहे.

नेताजींवर झाला होता प्राणघातक हल्ला...
सुभाषचंद्र बोस यांच्यावर बर्मामध्ये प्राणघातक हल्ला झाला होता, असा दावा निझामुद्दीन यांनी केला आहे. नेताजींवर अंदाधूंद गोळीबार करण्‍यात आला होता. त्यातील एक गोळी निझामुद्दीन यांच्या पाठीत घुसली होती. आझाद हिंद सेनेत डॉक्टर म्हणून काम करणारे 'कॅप्टन' लक्ष्मी सेहगल यांनी उपचार केला होता.

पुढील स्लाइडवर वाचा, निझामुद्दीन ऐकतात रेडिओ, पाहातात टीव्ही...