आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेटिझन्सना ऑनलाइन चॉकलेटची गोडी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीकर नागरिक ऑनलाइन चॉकलेट खरेदी करू लागले आहेत. चेन्नईतील लोकांना बॅटरीवर चालणार्‍या खेळण्या विकत घेण्याची ऑनलाइन घाई झाली आहे, असे चित्र भारतात गेल्या काही महिन्यात दिसून येत आहे. जुलै 2011 ते डिसेंबर 2012 या काळात नागरिकांचा ऑनलाइन खरेदीचा सपाटाच लावला आहे. इबे या ऑनलाइन कंपनीच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. 2015 पर्यंत ही उलाढाल 4 हजार 347 कोटीपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. देशातील 28 राज्यात 4 हजार 306 एवढे कॉमर्स हब आहेत. ऑनलाइन खरेदी-विक्रीत महाराष्ट्र, राजस्थान, तमिळनाडू, कर्नाटक, राजस्थान आघाडीवर आहेत. आंध्रप्रदेश, तमिळनाडू, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये इंटरनेटचे प्रमाण सर्वाधिक आहे.