आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RBI जारी करणार 100 रुपयांच्या नव्या नोटा, पैसे काढण्याची 24 हजारांची मर्यादा होणार रद्द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आठवड्याला 24 हजार रुपयांच्या कॅश विड्रॉवलची मर्यादा रद्द करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. फायनान्स सेक्रेटरी शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी म्हटले की, फार कमी लोक आठवड्याला 24 हजार किंवा महिन्याला 96 हजार रुपये सेव्हींग अकाऊंटमधून काढतात. त्यामुळे RBI लवकरच आठवड्याला घालून दिलेली पैसे काढण्याची मर्यादा रद्द करू शकते. दरम्यान, आरबीआयने म्हटले आहे की, 100 रुपयांच्या नव्या नोटा व्यवहारात येतील. त्या 2005 च्या महात्मा गांधी सीरीजच्या नोटांसारख्याच असतील. 

कशा असतील नव्या नोटा 
-RBI ने शुक्रवारी एक नोटिफिकेशन जारी केले. त्यात 100 रुपयांच्या नव्या नोटा महात्मा गांधी सीरीज सारख्याच असतील असे म्हटले आहे. 
- यात महात्मा गांधींचा फोटो असेल. दोन्ही नंबर पॅनलवर R इनसेट लेटर असेल. 
- नोटेवर आरबीआई गव्हर्नर उर्जित पटेल यांची सही असेल. 
- नोटेच्या मागच्या भागावर प्रिटिंग ईअर 2017 असेल. 
- आरबीआईने साफ स्पष्ट केले आहे की, आधीच्या 100 नोटाही चलनात कायम राहतील. 

दास म्हणाले, 90 दिवसांत रिमॉनिटायझेशन जवळपास पूर्ण झाले.. 
- करन्सी सप्लाय आणि त्याचे मॅनेजमेंट RBI ची जबाबदारी आहे आणि ते लवकरच वीकली कॅश विड्रॉअल लिमिटवरही निर्णय घेईल. 
- काही मोजके लोकच आठवड्याला लाख रुपये काढतात. त्यामुळे तसे पाहिले तर आता काही रिस्ट्रीक्शन नाहीत. 
- नोटबंदीच्या घोषणेच्या 90 दिवसांच्या आत रिमॉनिटायझेशनची प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली आहे. आम्ही किती जबाबदारीने काम केले हेच यावरून दिसत असल्याचे ते म्हणाले. 
- RBI ने 1 फेब्रुवारीपासून ATMs मधून कॅश विड्रॉवल लिमिट वाढवली होती. 
- सध्या एका वेळी 24 हजार रुपये काढता येतात, पण परत आठवडाभर पैसे काढता येत नाहीत. 

निर्णयामुळे होणारा फायदा.. 
मोठ्या शहरांत इतर बँकेच्या एटीएममधून महिल्याला 3 आणि शहरी भागांत 5 ट्रान्झॅक्शन फ्री आहेत. त्यानंतर प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर 20 रुपये लागतात. त्यामुळे एकदाच जास्त पैसे काढता येणार असल्याचे हे पैसे वाचतील. 

आरबीआयने का घेतला निर्णय?
आतापर्यंत 67% तलन पुन्हा चलनात आले आहे. डिजिटल ट्रान्झॅक्शन 40%, कार्ड पेमेंट 39% आणि पीओएसचा वापर 41% टक्के वाढला आहे. एटीएम आणि बँकांवरील दबाव कमी झाला आहे. त्यामुळे आता सूट दिली आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)