आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरोगसीसाठी लवकरच कायदा तयार करणार - कुटुंबकल्याण राज्यमंत्री अनुप्रिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सरोगसी नियंत्रणासाठी देशात कोणताही कायदा अस्तित्वात नाही. एकेरी पालकत्वाच्या दृष्टीने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार याचा मसुदा तयार करत आहे. लवकरच हे विधेयक चर्चेसाठी संसदेत मांडण्यात येणार असल्याची माहिती राज्यसभेत देण्यात आली. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्य मंत्री अनुप्रिया पटेल यांनी याविषयी माहिती सादर केली. सरोगसी नियंत्रण विधेयक २०१६ लवकरच संसदेत चर्चेसाठी येणार आहे. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नंसी (एमटीपी) कायद्यातही काही सुधारणा होणार आहेत. या कायद्याचा मसुदा तयार असून तो लवकरच कॅबिनेटसमोर सादर होईल.
डेंग्यूचे १२ बळी, केरळात सर्वाधिक : पावसाळ्यात डेंग्यूने १२ जणांचा मृत्यू झाला. देशभरात ८ हजार डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. कर्नाटकात डेंग्यूने ५ बळी घेतले. केरळात २,२५२ तर आेडिशात २,१७१ डेंग्यू रुग्ण आढळले, असे सरकारने राज्यसभेत स्पष्ट करण्यात आले. दोन राज्यांत डेंग्यूचा सर्वाधिक संसर्ग दिसून आला. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, दमण-दिव, अंदमान, निकोबार, हिमाचल प्रदेश ,जम्मू-काश्मीर राज्यात डेंग्यूचा एकही रुग्ण गेल्या २ महिन्यांत आढळून आला नाही. जून-जुलैमध्ये देशभरात ७,८७० डेंग्यू रुग्ण आढळले. मंत्रालयाने ११ राज्यांशी डेंग्यू निर्मूलनासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

अल्पसंख्याक वर्गातील २ कोटी
नवी दिल्ली । सरकारकडे स्कॉलरशिपसाठी २ कोटी ८ लाख ९९ हजार अर्ज आले होते. पैकी देशभरातील अल्पसंख्याक प्रवर्गातील शालेय व उच्च शिक्षण घेणाऱ्या २ कोटी विद्यार्थ्यांना विद्यावेतनाचा लाभ मिळाला. ही आकडेवारी गेल्या ३ वर्षांतील आहे. राज्यसभेत केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी ही माहिती दिली. पैकी शालेय स्तरावरील १ कोटी ८७ लाख ४९ हजार ८७६ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला तर उच्च शिक्षण घेणाऱ्या २१ लाख ४९ हजार ६४८ विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.
बातम्या आणखी आहेत...