आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्य चुकले : नव्या एटीएमबाबत बँका सुस्त, ग्राहकांच्या खिशाला कात्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नवे एटीएम लावण्यात सरकारी बँका आपल्या लक्ष्यापासून कोसोदूर आहेत. बँकांची ही सुस्ती ग्राहकांच्या खिशाला कात्री लावणारी ठरणार आहे. यामुळे आगामी काळात ग्राहकांना मोफत ट्रांझॅक्शन करण्याचे कमी पर्याय उपलब्ध असतील. सध्या ग्राहकांना इतर बँकांच्या एटीएमचा वापर महिन्याकाठी मेट्रो शहरांत तीन आणि इतर ठिकाणी पाच व्यवहार मोफत आहेत.

२२ सरकारी बँका लक्ष्यापासून दूर

वित्त मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, नव्या एटीएम लावण्याच्या अहवालानुसार बहुतेक बँकांचे काम समाधानकारक नाही. अहवालानुसार देशातील २७ सरकारी बँकांपैकी २२ बँका आपले लक्ष्य पूर्ण करण्यात अयशस्वी ठरल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये एकूण १९,९९४ एटीएम उभे करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. मात्र, डिसेंबरमधील ताज्या अहवालानुसार यापैकी केवळ १०,५११ एटीएम उभे राहिले आहेत. अशात मार्च २०१५ सरल्याने आता हे लक्ष्य अपूर्ण राहिले आहे.

१४ बँका सरासरी लक्ष्यापेक्षा मागे

वित्त मंत्रालयाच्या अहवालानुसार भारतीय स्टेट बँक, अलाहाबाद बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक, इंडियन बँक, ओबीसी, पंजाब व सिंध बँक, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, युको बँक, यूबीआय, विजया बँक आणि भारतीय महिला बँक सरासरी लक्ष्याच्या मागे आहेत, तर कॅनरा बँक, कॉर्पोरेशन बँक, आयडीबीआय बँक, एसबीबीजे, स्टेट बँक ऑफ पतियाळा यांनी मात्र याबाबत चांगली कामगिरी केली आहे.
श्रेणी-३ शहरांत सर्वाधिक परिणाम
वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मार्च २०१४ पर्यंत सरकारी बँकांचे एकूण १,०७,५७१ एटीएम होते. डिसेंबरमध्ये ही संख्या १,१८,०८२ पर्यंत पोहोचली. श्रेणी-३ची शहरे, गावांत एटीएमची कमी असल्याचा सर्वात जास्त परिणाम जाणवणार आहे. एक तर तेथे एटीएमची संख्या मुळातच कमी आहे. दुसरे आता जन-धनच्या माध्यमातून १२.५ कोटी लोकांनी खाती उघडली आहेत. हे सर्व लक्षात घेता मागील ८-९ महिन्यांत वाढलेल्या कोट्यवधी ग्राहकांचा भार एवढ्या कमी एटीएमवर पडणार आहे.